News Flash

बाधितांपेक्षा करोनामुक्त पुन्हा अधिक

कोराडी महानिर्मिती रुग्णालयात २० खाटांचे कोविड केअर केंद्र सुरू झाले आहे.

बाधितांपेक्षा करोनामुक्त पुन्हा अधिक

नागपूर : गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात ८८ करोना रुग्णांचा मृत्यू झाला  तर सहा हजार ४६१ नवे रुग्ण आढळले. दिलासादायक बाब म्हणजे, ७ हजार २९७ रुग्ण बरे होऊन घरी परतले.

शुक्रवारी दिवसभरात शहरात ३९, ग्रामीणमध्ये ३९ तर जिल्ह्याबाहेरील १० असे एकूण ८८ बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंतच्या एकूण मृतांची संख्या ७ हजार ३८८ वर पोहोचली आहे. यामध्ये ४ हजार ४८० शहरातील, १ हजार ८५३ ग्रामीण तर १ हजार ५५ रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. दिवसभरात ६ हजार ४६१ नव्या रुग्णांची भर पडली. यामध्ये ३ हजार ६४९ शहरातील, २ हजार ८०२ ग्रामीणचे तर १० जिल्ह्याबाहेरील आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण बाधितांचा आकडा ४ लाख ७७ हजार ७८६ वर पोहोचला आहे.

आजवर एकूण बाधितांमध्ये २ लाख ९४ हजार ३०२ शहरातील, ११ लाख २२ हजार ४८ ग्रामीणचे तर १ हजार २३७ जिल्ह्याबाहेरील आहेत. दिवसभरात ७ हजार २९३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामध्ये ४ हजार ८४७ शहरातील, २ हजार ४४७ ग्रामीणचे आहेत. दिवसभरात २२ हजार ८७६ चाचण्या झाल्या असून यामध्ये १८ हजार २८५ शहरातील, तर ४ हजार ५९१ ग्रामीणचे आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ७८.३८ एवढी आहे.

महानिर्मितीच्या रुग्णालयात २० खाटांचे करोना केंद्र

कोराडी महानिर्मिती रुग्णालयात २० खाटांचे कोविड केअर केंद्र सुरू झाले आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकारातून या कोविड केअर केंद्राचे संचालन शालिनीताई मेघे रुग्णालय करणार आहे. ग्रामीण भागातील अनेक करोना रुग्ण उपचारासाठी  नागपूर शहरात येत असतात. यामुळे नागपूरवर अधिक ताण पडतो. यातून मार्ग काढण्यासाठी कोराडी परिसरात कोविड केअर केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. या कोविड केअर केंद्रामध्ये १० प्राणवायू  खाटा तर १० सर्वसाधारण खाटा राहणार आहेत.  या कोविड केअर केंद्रात करोनाग्रस्त परंतु अधिक गंभीर नसलेल्या रुग्णांवर  उपचार होणार आहेत. ज्या रुग्णांच्या शरीरातील प्राणवायूची ९० च्या आसपास आहे आणि ज्यांचा एचआरसीटी स्कोअर ८ पेक्षा कमी आहे. अशाच रुग्णांवर या कोविड केअर केंद्रामध्ये उपचार होतील तर गंभीर स्वरूपाच्या  रुग्णांना शालिनीताई मेघेमध्ये पुढील उपचाराकरिता पाठवणार असल्याचे  या   केंद्राचे प्रमुख अश्विन रडके यांनी सांगितले.

राज्याचेच दिशानिर्देश कायम

उद्या, १ मे रोजी कामगार दिनानिमित्त सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील, असे वृत्त काही प्रसार माध्यमांमार्फत प्रसारित करण्यात आले आहे. मात्र अशाप्रकारचे कुठलेही निर्देश महापालिकेतर्फे देण्यात आलेले नाही. करोनाचा उद्रेक लक्षात घेता शासनाने यापूर्वी दिलेल्या दिशानिर्देशानुसार जाहीर केलेले निर्बंध कायम असून अत्यावश्यक सेवेतील औषध दुकाने व अत्यावश्यक सेवेतील इतर दुकाने यापूर्वी महापालिकेद्वारे  निर्धारित वेळेनुसार सुरू राहतील. तरी याबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये, असा खुलासा महापालिकेकडून करण्यात आला.

विदर्भात २७४ रुग्णांचा बळी 

विदर्भात करोनामुळे मृत पावलेल्यांची संख्र्या ऱ्याचता वाढवणारी आहे. शुक्रवारी दिवसभरात नागपूरात ८८ रुग्णांचा बळी गेला असून ६ हजार ४६१ नवे रुग्ण आढळले आहेत. अमरावतीमध्ये २१ मृत्यू ९६५ नवे रुग्ण, चंद्रपुरात २८ मृत्यू १ हजार ६६७ नवे रुग्ण, गडचिरोलीत १६ मृत्यू ५१९ नवे रुग्ण, भंडारा जिल्ह्यात १५ मृत्यू व १ हजार ३१ नवे रुग्ण, गोंदियात १६ मृत्यू तर ५४८ नवे रुग्ण, वाशीम ६ मृत्यू तर ४४८ नवे बाधित, अकोला ११ मृत्यू तर ५३७ नवे रुग्ण, बुलढाणा ४ मृत्यू तर १ हजार २१८ नवे रुग्ण, वर्धा ३५ मृत्यू, ९६४ बाधित तर यवतमाळ ३४ मृत्यू व १ हजार १६१ बाधित आढळले आहेत.

पक्वासा रुग्णालयातील करोना केंद्र उद्यापासून सुरू होणार

क्रीडा चौकातील  पक्वासा रुग्णालय व श्री आयुर्वेद महाविद्यालयातील करोना केंद्र रविवारपासून सुरू होणार आहे. या रुग्णालयात प्राणवायूसह व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. या  रुग्णालयातील १०० खाटांच्या रुग्णालयामुळे आरोग्य यंत्रणेवर पडलेला ताण काही प्रमाणात का होईना कमी होईल. रुग्णालयासाठी महापालिकेतर्फे प्राणवायू, औषध, जेवण, डॉक्टर्स, परिचारिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

८८ मृत्यू, ६,४६१ नवे रुग्ण  खाटांची उपलब्धता

शहरातील खाजगी व शासकीय रुग्णालये मिळून बाधितांसाठी किती खाटा (बेड्स) उपलब्ध आहेत, याची माहिती  www.nmcnagpur.gov.in  व  ttp://nsscdcl.org/covidbeds  वर  तसेच हेल्पलाईन  ०७१२-२५६७०२१ आणि २५५१८६६ यावर संपर्क साधल्यास उपलब्ध आय.सी.यू. प्राणवायू, व्हेंटिलेटर, खाटांची माहिती प्राप्त होईल. शुक्रवार रात्री ९ वाजेपर्यंत प्राणवायू खाटा १७४ आणि प्राणवायू नसलेल्या खाटा ४४ उपलब्ध होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2021 1:22 am

Web Title: corona patient corona virus infection corona positive akp 94
टॅग : Corona
Next Stories
1 मनोहर अंधारे यांचे निधन
2 ‘आयएफएस’ असोसिएशनची मुख्यमंत्र्यांकडे धाव
3 वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या नशिबी उपेक्षाच
Just Now!
X