News Flash

जिल्ह्य़ात २.३० टक्केच सक्रिय बाधित!

जिल्ह्य़ात २४ तासांत ७ करोनाबाधितांचा मृत्यू झाला तर २११ नवीन रुग्णांची भर पडली.

संग्रहीत छायाचित्र

२४ तासांत ७ मृत्यू; २११ नवीन रुग्ण

लोकसत्ता खास प्रतिनिधी

नागपूर : जिल्ह्य़ात २४ तासांत ७ करोनाबाधितांचा मृत्यू झाला तर २११ नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्य़ातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या १ लाख ३४ हजार ९२७ रुग्णांवर पोहचली आहे. त्यातील १ लाख २७ हजार ६३७ व्यक्ती करोनामुक्त झाल्याने आता जिल्ह्य़ातील सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ११२ रुग्णांवर (२.३० टक्के) आली आहे.

दिवसभरात आढळलेल्या नवीन रुग्णांत शहरातील १५०, ग्रामीणचे ५८, जिल्ह्य़ाबाहेरील ३ अशा एकूण २११ रुग्णांचा समावेश आहे.  २४ तासांत शहरात २, ग्रामीणला २, जिल्ह्य़ाबाहेरील ३ असे एकूण ७ मृत्यू झाले. शहरात दिवसभरात १९०, ग्रामीण ४८ असे एकूण २३८ व्यक्ती करोनामुक्त झाले.  सध्या गंभीर संवर्गातील ५६३ रुग्णांवर विविध रुग्णालयांत तर २ हजार ३३८ रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2021 11:02 am

Web Title: corona patients update dd70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 लोकजागर : अध्यक्षांचा ‘अंत:स्वर’!
2 विकासकामांना ना स्थगिती, ना निधी!
3 उमेदवारी परत घेण्यासाठी मला धमक्यांचे फोन!
Just Now!
X