एकूण बळींची संख्या सहा हजार पार; २४ तासांत नवीन ५,८१३ रुग्णांची भर

नागपूर : जिल्ह्यात २४ तासांत ७४ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यूसंख्येचा हा नवीन उच्चांक आहे. दिवसभरात जिल्ह्यात नवीन ५ हजार ८१३ नवीन रुग्णांची भर पडली.

नवीन दगावलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ३९, ग्रामीण ३०, जिल्ह्याबाहेरील ५ अशा एकूण ७४ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या ३ हजार ७५१, ग्रामीण १ हजार ३४८, जिल्ह्याबाहेरील ९३५ अशी एकूण ६ हजार ३४ रुग्णांवर पोहोचली आहे. दिवसभरात शहरात ३ हजार ४५८, ग्रामीण २ हजार ३५०, जिल्ह्याबाहेरील ५ असे एकूण ५ हजार ८१३ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या २ लाख २७ हजार ३७४, ग्रामीण ७४ हजार ३५८, जिल्ह्याबाहेरील १ हजार ११७ अशी एकूण ३ लाख २ हजार ८४९ रुग्णांवर पोहोचली. दिवसभरात शहरात ३ हजार ४१६, ग्रामीण १ हजार २१८ असे एकूण ४ हजार ६३४ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ८३ हजार ९३९, ग्रामीण ४८ हजार ७६६ अशी एकूण २ लाख ३२ हजार ७०५ व्यक्तींवर पोहोचली. आजपर्यंतच्या बाधितांच्या तुलेत हे करोनामुक्तांचे प्रमाण आणखी घसरून ७६.८३ टक्क्यांवर आले आहे.

विदर्भात करोनाचे १९० बळी

विदर्भाच्या अकरा जिल्ह्यात सलग दोन दिवस १६० हून अधिक करोनाग्रस्तांचा मृत्यू होत असतानाच गुरुवारी दिवसभरात  १९० अशी नवीन उच्चांकी मृत्यू संख्या नोंदवली गेली. तर २४ तासांत तब्बल १२ हजार ५२८ नवीन रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे.नागपूरच्या शहरी भागात दिवसभरात ३९, ग्रामीण ३०, जिल्ह्याबाहेरील ५, असे एकूण जिल्ह्यात ७४ करोनाग्रस्तांचे मृत्यू झाले. तर येथे ५ हजार ८१३ रुग्णांची भर पडली. भंडाऱ्यात २२ रुग्णांचा मृत्यू तर १ हजार २६२ रुग्ण आढळले. अमरावतीत १० मृत्यू तर ५३४ नवीन रुग्ण आढळले. चंद्रपूरला १६ मृत्यू तर १ हजार १७१ रुग्ण आढळले. गडचिरोलीत

९ मृत्यू तर ३२८ रुग्ण आढळले. गोंदियात १६ मृत्यू तर ६१६ रुग्ण आढळले. यवतमाळला २२ मृत्यू तर ९०१ रुग्ण आढळले. वाशीमला

५ मृत्यू तर ३८४ रुग्ण आढळले. अकोल्यात ७ मृत्यू तर ३३१ रुग्ण आढळले. बुलढाण्यात ३ मृत्यू तर ७३४ रुग्ण आढळले. वर्धा</p>

जिल्ह्यात ६ मृत्यू तर ४५४ रुग्ण आढळले. विदर्भात १९० असे उच्चांकी संख्येने रुग्णांचा मृत्यू झाल्यासह त्यातील ३८.९४ टक्के नागपुरातील होते, हे विशेष. शहरात लसीकरणाची स्थिती

पहिली मात्रा

आरोग्य सेवक        – ४११९८

फ्रंट लाईन वर्कर    –  ३५९१९

४५ + वयोगट        –   ६९१०३

४५ + कोमार्बिड    – ६६९८३

६० + सर्व नागरिक  – १,४५,१८०

पहिली मात्रा – एकूण : – ३,५८,३८३

दुसरी मात्रा

आरोग्य सेवक        – १५८७२

फ्रंट लाईन वर्कर     –  ८६९९

४५ + वयोगट        –   ७४६

४५ + कोमार्बिड    –  १७७९

६० + सर्व नागरिक   – ५९६९

दुसरी मात्रा – एकूण – ३३०६५

५३ हजार करोनाग्रस्त

गृह विलगीकरणात

शहरात ३९ हजार ३९०, ग्रामीण २१ हजार ७२० असे एकूण ६१ हजार ११०  उपचाराधीन करोनाग्रस्त आहेत. त्यातील गंभीर संवर्गातील ७ हजार ८५९ रुग्णांवर विविध कोविड रुग्णालय वा कोविड केअर तर ५३ हजार २५१ रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत.

साडेबावीस हजार चाचण्या

शहरात १५ हजार १७३, ग्रामीणला ७ हजार ४०२ अशा एकूण २२ हजार ५७५  चाचण्या झाल्या. बुधवारी ही संख्या जिल्ह्यात २१ हजार ५५८ होती. त्यातुलनेत गुरुवारी  किंचित वाढ झाली.

खाटांची उपलब्धता

शहरातील शासकीय व खाजगी रुग्णालय मिळून बाधितांसाठी किती खाटा (बेडस) उपलब्ध आहे याची माहिती  www.nmcnagpur.gov.in http://nsscdcl.org/covidbeds  वर क्लिक करुन घेता येईल. तसेच हेल्पलाईन  ०७१२-२५६७०२१ आणि २५५१८६६ यावर संपर्क साधल्यास उपलब्ध आई.सी.यू. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, खाटांची माहिती प्राप्त होईल. गुरुवार रात्री ९ वाजेपर्यंत ऑक्सिजन खाटा ३० आणि

नॉन ऑक्सिजन खाटा १८ उपलब्ध होत्या.