26 September 2020

News Flash

करोनाग्रस्ताच्या घरातील र्निजतुकीकरणामुळे चोरीच्या तपासाचा पेच!

कुटुंबातील एक तरुण १२ जुलैला करोना रुग्ण असल्याचे चाचणीत पुढे आले.

संग्रहित छायाचित्र

आधी भीतीपोटी पोलीस थांबले, नंतर चोराच्या हाताचे ठसेच मिटले

नागपूर :  कुशीनगरच्या एका तरुणाला करोना झाला. तो  रुग्णालयात तर त्याचे कुटुंबीय विलगीकरणात गेले. घर टाळेबंद झाले. परंतु नेमकी हीच संधी साधून चोरटय़ाने त्या घरात चोरी केली. तो तरुण करोनामुक्त होऊन घरी परतल्यावर हा प्रकार पुढे आला. त्याने पोलिसांत तक्रार दिली. परंतु घर करोना रुग्णाचे असल्याने पोलीस तपासासाठी आत जायला तयार नव्हते. अथक प्रयत्नाअंती तरुणाने  महापालिकेकडून घराचे र्निजतुकीकरण करून घेतले. परंतु यामुळे चोराच्या हाताचे ठसे मिटल्याची शंका आता खुद्द हा तरुणच व्यक्त करतोय.

कुशीनगरच्या या कुटुंबातील एक सदस्य पोलिसात आहे. याच कुटुंबातील एक तरुण १२ जुलैला करोना रुग्ण असल्याचे चाचणीत पुढे आले. त्याला मेडिकलला दाखल करत इतर सदस्यांना विलगीकरणात घेतले गेले. त्यामुळे हे घर कुलूपबंद होते. हे घर व परिसर प्रतिबंधित झाला. येथे पोलीस बंदोबस्त असतानाही त्यांच्या घरात चोरी झाली.

तरुण करोनामुक्त होऊन घरी परतल्यावर हा प्रकार पुढे आला. तो घरी आल्यावरही त्याचे कुटुंब विलगीकरणात होते. घरी दाराची कुंडी तुटलेली असल्याने त्याला चोरी झाल्याचे कळले. तरुणाने तातडीने जरीपटका पोलीस ठाणे गाठत चोरीची तक्रार दिली. दरम्यान, पोलिसांना त्याच्या घराचे महापालिकेकडून र्निजतुकीकरण झाले नसल्याचे कळले. त्यामुळे घाबरलेल्या पोलिसांनी तरुणाला प्रथम महापालिकेशी समन्वय करून घराचे र्निजतुकीकरण  करण्यास सांगितले.

तरुणाने पाठपुरावा करत स्थानिक नगरसेवकाच्या मदतीने र्निजतुकीकरण  केले. परंतु ते करताना चोराच्या हाताचे ठसे मिटले, अशी शक्यता हा तरुणच व्यक्त करतो. खरच असे घडले असेल तर चोर कसा पकडला जाईल, हा मोठाच प्रश्न  आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 2:27 am

Web Title: corona positive patient theft crime fraud find lock down akp 94
Next Stories
1 ‘कोविड केअर सेंटर’ला तपासणी कधी होणार?
2 बारावी नापासांची फेरपरीक्षेची संधी हुकणार?
3 व्यायामशाळा अस्थिपंजर अवस्थेत
Just Now!
X