News Flash

प्रादेशिक मनोरुग्णालयातही करोनाचा शिरकाव

शरीरात ऑक्सिजनची मात्रा योग्य असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांना परत मनोरुग्णालयात मेडिकलकडून पाठवले गेले.

तीन मनोरुग्णांसह पाच जणांना बाधा

नागपूर : उपराजधानीतील प्रादेशिक मनोरुग्णालयातही करोना विषाणूने शिरकाव केला असून येथे उपचार घेणाऱ्या तीन मनोरुग्णांसह एकूण पाच जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेत त्यांनाही विलगीकरणात घेतले जाणार आहे.

बाधितांमध्ये तिन्ही मनोरुग्ण महिला असून येथे विविध उपक्रम राबवण्यात मदत करणाऱ्या टाटा ट्रस्टच्या दोन कर्मचाऱ्यांनाही करोनाची बाधा झाली आहे. या सगळ्यांना तातडीने मेडिकलमध्ये नेऊन त्यांच्या विविध वैद्यकीय तपासणी करण्यात आल्या. त्यांच्या शरीरात ऑक्सिजनची मात्रा योग्य असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांना परत मनोरुग्णालयात मेडिकलकडून पाठवले गेले. या रुग्णांवर उपचारासाठी मनोरुग्णालय प्रशासनाने स्वतंत्र वार्ड तयार करत उपचाराची सोय केली आहे. परंतु या रुग्णांना स्वत:च्या वेदना सांगता येत नसल्यामुळे अचानक त्यांची प्रकृती खालवल्यास नवीन प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तर येथील इतरही रुग्णांवर प्रशासनाकडून नजर रोखण्यात आली असून एकही लक्षणे दिसताच तातडीने वरिष्ठांना सूचना देत त्यांची चाचणी करण्याचे आदेश दिले गेले आहेत.  येथील तीन रुग्णांसह दोन टाटा ट्रस्टच्या कर्मचारी बाधित झाल्याच्या वृत्ताला येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी दुजोरा दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 12:07 am

Web Title: corona virus in regional psychiatric hospital akp 94
Next Stories
1 एका दिवसात तब्बल १८ करोनाग्रस्तांचा मृत्यू
2 वेळापत्रक जाहीर; मात्र परीक्षा ‘अ‍ॅप’चा पत्ताच नाही!
3 नुसतेच ‘टाळे’, ‘बंदी’ नाहीच!
Just Now!
X