नागपुरातील ‘जमाअत ए इस्लामी हिंद’चा सेवाधर्म!

नागपूर : करोना विषाणू साथीच्या काळात जवळची, रक्ता-नात्याची माणसे संसर्गाच्या भीतीने दूर झाली, पण त्यांची कमतरता अनोळखी, माणसांनी भरून काढली. नागपुरातील पाचपावली येथेही असेच घडले. ज्यांना रक्ताचे नातेही परके झाले होते, त्यांच्या वेदनेवर फुंकर घालण्याचे काम ‘जमाअत ए इस्लामी हिंद’ या संघटनेचे कार्यकर्ते करीत आहेत.  पाचपावली येथील करोना उपचार केंद्रात ‘जमाअत ए इस्लामी हिंद’ या संघटनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते करोना रुग्णांची मोफत सेवा करीत आहेत. संस्थेकडे डॉक्टर, परिचारिका, परिचारक आणि वैद्यकीय सेवा देणारे असे जवळपास ७० पेक्षा अधिक कार्यकर्ते आहेत. ते धोका पत्करून रुग्णांची सेवाशुश्रूषा करीत आहेत.

मार्चमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला आणि एप्रिलमध्ये तर तिने कहर केला. हा संसर्गजन्य आजार असल्याने कुणी कुणाजवळ जाण्यास तयार नव्हते. अनेकांच्या बाबतीत रक्ताचे नातेही परके झाले. अशा परिस्थितीत ‘जमाअत ए इस्लामी हिंद’चे पदाधिकारी पुढे सरसावले. त्यांनी महापालिकेच्या सहाकार्याने पाचपावली येथे  करोना उपचार केंद्र सुरू केले. याच संघटनेशी संबंधित ‘मेडिकल सव्र्हिस सोसायटी ऑफ इंडिया’ ही नागपूरमधील संस्था या केंद्राचे संचालन करत आहे.

पाचपावली येथे ७८ खाटांचे रुग्णालय, त्याच ठिकाणी बाह््यरुग्ण विभाग, फार्मसीची व्यवस्था करण्यात आली आहे. औषधे निङ्मशुल्क उपलब्ध करून दिली जात आहेत. ‘जमाअत ए इस्लामी हिंद’चे महाराष्ट्राचे अध्यक्ष जिवानू रॅहमना खान, शहर अध्यक्ष डॉ. अनवर सिद्दिकी, सव्र्हिस सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सिद्दिकी अहमद, डॉ. नईम नियाजी, माजी अध्यक्ष डॉ. सिद्दिकी अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपावली उपचार केंद्रात हे सेवाकार्य सुरू आहे.

प्राणवायूची टंचाई असताना संस्थेच्या कार्यकर्त्यांनी शंभर प्राणवायू सिलिंडर खरेदी केले आणि गरजूंच्या घरी पोहोचवले. ‘‘रुग्ण कुठल्या धर्माचा किंवा जातीचा आहे हा विचार आम्ही कधीच केला नाही. तो आमच्यासाठी एक माणूस आहे, इतकेच पुरेसे होते. प्राणवायू नि:शुल्क उपलब्ध करून देताना अनेक लोकांचे आम्हाला आशीर्वाद मिळाले’’, असे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

ज्यांना औैषधांची, प्राणवायूची किंवा अन्य मदतीची गरज आहे, त्यांच्यासाठी आमचे कार्यकर्ते धावून जात आहेत. आता पुन्हा आम्ही २५ प्राणवायू सिलिंडर खरेदी केले आहेत. ते पाचपावली केंद्रात उपयोगात आणले जात आहेत. आमचे काम बघून अनेक संस्था आमच्या मदतीला येत आहेत, असेही संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

 

डॉक्टरांतर्फे निङ्मशुल्क सेवा

या केंद्रात एप्रिलमध्ये ३०० हून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले. दररोज पाच ते सहा रुग्ण केंद्रामध्ये दाखल होत होते. सध्या ४७ रुग्ण दाखल आहेत. ४० पेक्षा अधिक कार्यकर्ते दिवसरात्र सेवा देत आहेत. तसेच सव्र्हिस सोसायटीद्वारे डॉक्टरांचे पथक रुग्णांवर मोफत उपचार करत आहेत. या सेवाकार्यात डॉ. इरफान, डॉ. फैजान जव्वाद , डॉ. मोहंमद आसीम, डॉ. आसीफुजमा खान, शफीक अहमद, काजी शफीक अहमद, मोहंमद उमर खान, शहजाद नवेद, तौसीफ जाफर, आसिम परवेज कबीरुद्दीन खान, अल्ताफुर्रहमान यांचा समावेश आहे.

आजीच्या नातेवाईकांची गोष्ट

या केंद्रात एप्रिलमध्ये एक ८० वर्षीय आजी उपचारांसाठी दाखल झाल्या होत्या. १० ते १२ दिवसांनी बरे झाल्यानंतर त्यांना घरी जायचे होते. आजींच्या नातेवाईकांना फोन करण्यात आला. पलीकडून उत्तर आले, ‘‘आजीला संसर्ग नसेल तरच घरी पाठवा.’’ आजी बऱ्या झाल्या, पण त्यांचे नातेवाईक त्यांना घ्यायला आले नाहीत. अखेर आजीबाईंना आम्ही त्यांच्या घरी पोहोचवले, असे डॉ. रिझवी यांना सांगितले.

 

नमाजमध्ये निधी संकलन

मोमीनपुरा येथील जामा मस्जिदमध्ये दर शुकवारी नमाजच्यावेळी जो निधी गोळा होतो तो करोना रुग्णांसाठी दिला जातो. सोबतच सय्यद जाफर एज्युकेशन, तीनबंधू संघटना, दीनदयाल संघटनाही सहकार्य करीत असल्याचे ‘जमाअत ए इस्लामी हिंद’च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.