News Flash

कठोर निर्बंधांची अंमलबजावणी सुरू

खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणे बंद राहतील.

शनिवार, रविवार पूर्ण टाळेबंदी; खासगी कार्यालयांचे कामकाज घरातूनच

नागपूर : वाढता करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत  कठोर निर्बंध घातले आहेत. त्या निर्बंधांची प्रत्यक्ष सोमवारी रात्री ८ पासून सुरू झाली.

३० एप्रिलपर्यंत हे कठोर निर्बंध लागू राहणार आहेत.  या निर्बंधातून शेतीविषयक कामे, सार्वजनिक व खासगी वाहतुकीला वगळण्यात आले आहे. खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणे बंद राहतील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्रीपासून तर सोमवारी सकाळपर्यंत संपूर्ण टाळेबंदी राहणार आहे.  मद्यविक्रीची सर्व दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील, असे उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक गोतमारे यांनी कळवले आहे. याशिवाय राज्यात १४४ कलम लागू झाले आहे.  सकाळी ७ ते रात्री ८ जमावबंदी म्हणजे ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.

मद्य दुकानांपुढे प्रचंड गर्दी

टाळेबंदीचे नवे निर्बंध सोमवार रात्रीपासून लागू होत असल्याने शहरातील मद्याच्या दुकानांपुढे सोमवारी नागरिकांनी एकच गर्दी केली. मद्यविक्रेत्यांच्या सांगण्यानुसार, दररोज ८ वाजेपर्यंत थेट दुकानातून तर रात्री दहापर्यंत घरपोच सेवेला परवानगी  होती. मात्र सोमवारी थेट आठ वाजतापासूनच शहरातील सर्व  दुकाने बंद करण्याचे आदेश आले. आता ३० एप्रिलपर्यंत मद्य दुकाने कडकडीत बंद राहणार असल्याचेही विक्रेते सांगत आहेत. विशेष म्हणजे, दिवसभर दुकानांपुढे फारशी गर्दी नव्हती. मात्र जेव्हा नागरिकांना महापालिका आयुक्तांचा संदेश समाजमाध्यमांवर कळला तेव्हा अनेकांनी दुकानाकडे धाव घेतली.  शहराप्रमाणे ग्रामीण भागातही सर्व मद्याची दुकाने बंद असतील.

… तर गृहप्रकल्प ‘मिनी कंटेन्मेंट’

पाचपेक्षा जास्त रुग्ण एखाद्या गृहप्रकल्पात आढळल्यास ती इमारत मिनी कंटेन्मेंट म्हणून घोषित करण्यात येईल. तसा फलक लावून बाहेरच्या लोकांना प्रवेश बंदी घातली जाईल.

हे सुरू राहील

किराणा, औषध, भाजीपाला

वृत्तपत्रे छपाई आणि वितरण

सर्व प्रकारची वाहतूक

शेती व शेतीविषयक कामे, अन्नधान्य व शेतमालाची वाहतूक

उद्योग व उत्पादन क्षेत्र

ई-कॉमर्स सेवा

बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषध, मेडिक्लेम, दूरसंचार, अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज, पाणीपुरवठा करणारी कार्यालये.

हे बंद राहील

मनोरंजन व करमणुकीची स्थळे

क्लब्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृहे, वॉटर पार्क

सर्वधर्मीयांची स्थळे बाहेरून येणारे  भक्त व दर्शनार्थीसाठी बंद

केशकर्तनालय, ब्युटी पार्लर्स, स्पा

शाळा- महाविद्यालये बंद राहतील. १० व १२ परीक्षांचा अपवाद. खासगी शिकवण्या बंद

उद्याने, चौपाटी आदी सार्वजनिक ठिकाणे रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्णत: बंद

खासगी कार्यालयांना पूर्णपणे ‘वर्क फ्रॉम’ होम

रस्त्याच्या कडेवरील खाद्य विक्रेत्यांना सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत के वळ पार्सलसाठी मुभा.

उपाहारगृहे व बार पूर्णत: बंद. पण, उपाहारगृह एखाद्या हॉटेलचा भाग असेल तर अभ्यागतांसाठीच सुरू

शासकीय कार्यालये

५० टक्के उपस्थितीत

जी थेट करोनाशी संबंधित नाहीत अशा शासकीय कार्यालयातील कर्मचारी उपस्थिती ५० टक्केच असेल

शासकीय कार्यालयात अभ्यागतांना प्रवेश नसेल. आवश्यक असेल तर कार्यालय किंवा विभाग प्रमुखाचा प्रवेश पास लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 12:01 am

Web Title: corona virus infection stop corona virus lockdown akp 94
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मेडिकलमध्ये वृद्ध दाम्पत्याचे लसीकरण
2 फेब्रुवारीनंतर प्रथमच बाधितांपेक्षा करोनामुक्त अधिक
3 करोनामुळे नाही तर आर्थिक संकटामुळे व्यापारी मरतील
Just Now!
X