जिल्ह्य़ात १० मृत्यू, १९७ नवे रुग्ण

नागपूर : जिल्ह्यत नव्या करोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूच्या आलेखात घट कायम आहे. शुक्रवारी दिवसभरात दहा रुग्णांचा मृत्यू झाला तर १९७ नवे रुग्ण आढळले. करोनाग्रस्त बरे होण्याचे प्रमाण ९७.१६ टक्के आहे.

मृतांमध्ये पाच रुग्ण शहरातील, एक ग्रामीण तर ४ जिल्ह्यबाहेरील आहेत. मृत्यूची एकूण संख्या ८ हजार ९४३ वर गेली आहे. १९७ नवे रुग्ण आढळले. यात १२० शहरातील, ७३ ग्रामीणचे तर ४ जिल्ह्यबाहेरील आहेत.  एकूण रुग्णांची संख्या ४ लाख ७५ हजार ३९९ वर पोहोचली आहे. याशिवाय दिवसभरात ४२८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामध्ये २२८ शहरातील,२०० ग्रामीणचे आहेत. आजपर्यंत चार लाख ६१ हजार ८८१ रुग्ण करोनामुक्त झाले. दिवसभरात ११ हजार ३५४ रुग्णांची चाचणी करण्यात आली. यामध्ये ८ हजार ५४५ शहरातील तर २ हजार ८०९ ग्रामीणचे आहेत. चाचण्याच्या तुलनेत नवे रुग्ण आढळण्याची संख्या अल्प आहे.

विदर्भात ४९ रुग्णांचा बळी 

शुक्रवारी विदर्भात करोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या ४९ इतकी होती. दिवसभरात नागपुरात १० रुग्णांचा बळी गेला तर १९७ नवे रुग्ण आढळले. अमरावतीमध्ये १० मृत्यू  तर ३२० नवे रुग्ण आढळले. वध्रेत ५ मृत्यू व ६३ बाधित, यवतमाळ ५ मृत्यू १०७ बाधित, भंडारा  १ मृत्यू व ११६ नवे रुग्ण, गोंदियात ० मृत्यू तर ६५ नवे रुग्ण, वाशीम २ मृत्यू तर ८६ नवे  बाधित, अकोला ७ मृत्यू तर १५२ नवे रुग्ण, बुलढाणा ४ मृत्यू तर १८० नवे रुग्ण, चंद्रपूर ५ मृत्यू १५० नवे रुग्ण, गडचिरोलीत ० मृत्यू ४५ नवे रुग्ण आढळले.

परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण सुरू

परदेशात शिक्षणासाठी जात असलेल्या १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाची सुरुवात महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयासमोरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे गर्ल्स हॉस्टेल, गांधी नगर आणि पाचपावली स्त्री रुग्णालय, पाचपावली येथे करण्यात आली. लसीकरणासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसला. इंदिरा गांधी रुग्णालय येथे पूर्वा मालवडे, परिणीता यादव, हर्षल जैस्वाल, संकेत डाहुले, दीक्षांत नंदनवार आणि इतर विद्यार्थानी पहिली लस घेतली. यावेळी अमित बागडे यांनी सांगितले की,  तो  रशियाला उच्च शिक्षणासाठी जाणार आहे. त्यासाठी लस आवश्यक होती. महापालिकेने लस देण्याची व्यवस्था केल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक सूचना व माहितीकरिता नियंत्रण कक्षामध्ये ०७१२२५६७०२१ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.