उपराजधानीत ५९ रुग्ण असल्याचे पसरविले

नागपूर : करोना विषाणूने उपराजधानीत ५९ रुग्ण आढळले असून उपचार करणारा एक डॉक्टर व्हेंटीलेटरवर असल्याचा दावा करणाऱ्या तिघांविरुद्ध शहर पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत अफवा पसरवणे, शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील तीन आरोपींना सायबर पोलिसांनी अटक केली असून सदर पोलिसांच्या ताब्यात दिले.

जय ऊर्फ मोनू ओमप्रकाश गुप्ता (३७) रा. अमरविहार सोसायटी, कामठी रोड, कपिलनगर, अमित शिवपाल पारधी (३८) रा. मिसाळ लेआऊट, जरीपटका आणि दिव्यांशू रामविलास मिश्रा (३३) रा. संयुगनगर, अजनी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. जगभरात करोनाची दहशत असून केंद्र व राज्य सरकारने देशभरात सामाजिक अंतर ठेवण्यासाठी संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक सुविधा वगळता इतर सर्व व्यवहारांना टाळेबंदी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आरोपींनी एकमेकांशी भ्रमणध्वनीवर संवाद साधून उपराजधानीत करोनाचा संसर्ग झालेले ५९ रुग्ण आढळले असून त्यांच्यावर मेयो व मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत.

रामटेकमध्येही गुन्हा दाखल

करोनासंदर्भात फेसबुकवरून अफवा पसरवणाऱ्या व्यक्ताविरुद्ध रामटेक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलेश रतनलाल भाटी (३८) रा. राजाजी वार्ड, रामटेक असे आरोपीचे नाव आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. लोकांनी रस्त्यावर येऊ नये म्हणून देशात संचारबंदी लागू करण्यात आली. पण, आरोपीने २६ मार्चला आपल्या फेसबुक पानावर २५ ते २६ डिग्री तापमानात करोनाचा प्रसार होत नसून रामटेकमधील लोक घराबाहेर पडू शकतात, असा संदेश टाकला. याप्रकरणी रामटेकच्या तहसीलदारांना पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. पोलीस शिपाई आकाश शिरसाठ यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हा जिल्’ातील दुसरा गुन्हा असून पहिला गुन्हा सदर पोलीस ठाण्यात दाखल झाला असून त्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली.