News Flash

मृत्यू, बाधित व चाचण्यांचाही उच्चांक

नवीन मृत्यूंमध्ये शहरातील ३४, ग्रामीण २५, जिल्ह्याबाहेरील ७ अशा एकूण ६६ रुग्णांचा समावेश आहे.

संग्रहीत

२४ तासांत ६६ मृत्यू; ५,३३८ रुग्ण

नागपूर : एकीकडे जिल्ह्यातील नावाजलेल्या खासगी रुग्णालयांसह शासकीय रुग्णालयांत गंभीर  करोना रुग्णांसाठी खाटा शिल्लक नाहीत. दुसरीकडे जिल्ह्यात प्रथमच २४ तासांत ६६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू तर ५ हजार ३३८ नवीन रुग्णांची भर पडली आहे. हा आजपर्यंतच्या मृत्यू व नवीन करोनाबाधितांच्या संख्येचा उच्चांक आहे. याशिवाय जिल्ह्यात १९ हजारांवर चाचण्यांचाही नवीन उच्चांक नोंदवला गेला.

नवीन मृत्यूंमध्ये शहरातील ३४, ग्रामीण २५, जिल्ह्याबाहेरील ७ अशा एकूण ६६ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या ३ हजार ४५८, ग्रामीण १ हजार १५८, जिल्ह्याबाहेरील ८८८ अशी एकूण ५ हजार ५०४ रुग्णांवर गेली आहे. दिवसभरात शहरात ३ हजार २८३, ग्रामीण २ हजार ४८, जिल्ह्याबाहेरील ७ असे एकूण ५ हजार ३३८ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या १ लाख ९६ हजार ७३३, ग्रामीण ५६ हजार ४१८, जिल्ह्याबाहेरील १ हजार ७० अशी एकूण २ लाख ५४ हजार २२१ रुग्णांवर पोहोचली आहे.  दिवसभऱ्यात शहरात २ हजार ८९०, ग्रामीण ९७८ असे एकूण ३ हजार ८६८ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या १ लाख ६४ हजार ९७२, ग्रामीण ४० हजार ८१२ अशी एकूण २ लाख ५ हजार ७८४ व्यक्तींवर पोहोचली आहे. करोनामुक्तांचे हे  प्रमाण ८०.९५ टक्के आहे.

विदर्भात तब्बल ११३ बळी

विदर्भाच्या अकरा जिल्ह्यांत प्रथमच २४ तासांत ११३ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. करोनाच्या दुसऱ्या लाटेत एका दिवसात १० हजार २२५ नवीन रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे.  एकूण मृत्यूंमध्ये नागपुरातील ५८.४० टक्के मृत्यूंचा समावेश आहे. नागपूर शहरात दिवसभरात ३४, ग्रामीण २५, जिल्ह्याबाहेरील ७ असे एकूण ६६ रुग्णांचे मृत्यू झाले.  दिवसभरात जिल्ह्यात ५ हजार ३३८ नवीन रुग्णांची भर पडली. चंद्रपूरला ५ मृत्यू, तर ६३७ रुग्ण आढळले. गडचिरोलीत ४ मृत्यू, तर १८५ रुग्ण आढळले. अमरावतीत ४ मृत्यू, तर ३४४ रुग्ण आढळले. गोंदियात ६ मृत्यू, तर ५७१ रुग्णांची भर पडली. यवतमाळला ८ मृत्यू, तर ३५० रुग्ण आढळले. वर्धेत १ मृत्यू, तर ४६५ रुग्ण आढळले. भंडारात ९ मृत्यू, तर १ हजार १७७ रुग्णांची भर पडली. वाशिममध्ये एकही मृत्यू नाही, पण २६९ रुग्ण आढळले. अकोल्यात ८ मृत्यू, तर २६३ रुग्ण आढळले. बुलढाण्यात २ मृत्यू, तर ६२६ रुग्ण आढळले. विदर्भातील पूर्वी सर्वात कमी रुग्ण आढळणाऱ्या गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात मृत्यू व नवीन बाधित वाढताना दिसत  आहेत.

१९ हजार चाचण्या

शहरात दिवसभरात १० हजार ४४८, ग्रामीण ८ हजार ७४३ अशा एकूण १९ हजार १९१  चाचण्या झाल्या. त्यांचा अहवाल गुरुवारी अपेक्षित आहे. परंतु मंगळवारी झालेल्या १४ हजार ५७६ चाचण्यांमध्ये तब्बल ५ हजार ३३८ रुग्णांना करोना असल्याचे निदान झाल्याने सकारात्मक अहवालाचे प्रमाण ३६.६२ टक्के झाले आहे.

गंभीर संवर्गातील ५,३३८ रुग्ण रुग्णालयांत

शहरात २९ हजार ४५, ग्रामीण १३ हजार ८८८ असे एकूण जिल्ह्यात ४२ हजार ९३३  उपचाराधीन  रुग्ण आहेत. त्यातील ३७ हजार ३६ रुग्ण गृहविलगीकरणात तर गंभीर संवर्गातील ५ हजार ८९७ रुग्णांवर विविध कोविड रुग्णालय, कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 12:00 am

Web Title: corona virus patient deaths disasters and trials akp 94
Next Stories
1 कृषी महाविद्यालयांच्या दर्जात घसरण
2 ‘मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी राज्य सरकारकडून ३७२.०८ कोटी’
3 बाजारपेठबंदीचा गोंधळ!
Just Now!
X