News Flash

सक्रिय करोनाग्रस्तांची संख्या ७० हजारांहून खाली

सक्रिय रुग्णांमध्ये शहरातील ३८ हजार ८८४, ग्रामीणचे ३० हजार ३१५ असे एकूण जिल्ह्यातील ६९ हजार १९९ रुग्णांचा समावेश आहे.

२४ तासांत ७१ मृत्यू; नवीन ४,१८२ रुग्ण

नागपूर : जिल्ह्यात २४ तासांत ७१ करोना रुग्णांचा मृत्यू तर ४ हजार १८२ नवीन रुग्णांची भर नोंदवण्यात आली. एकीकडे नवीन रुग्णांची संख्या कमी होत असताना  दुसरीकडे करोनामुक्त वाढल्याने जिल्ह्यातील सक्रिय रुग्णाचंी संख्या १९ एप्रिलनंतर प्रथमच ७० हजारांच्या खाली गेली आहे.

सक्रिय रुग्णांमध्ये शहरातील ३८ हजार ८८४, ग्रामीणचे ३० हजार ३१५ असे एकूण जिल्ह्यातील ६९ हजार १९९ रुग्णांचा समावेश आहे. शहरात दिवसभरात २ हजार ४९८, ग्रामीण १ हजार ६७४, जिल्ह्याबाहेरील १० असे एकूण जिल्ह्यात ४ हजार १८२ रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या ३ लाख ६ हजार ७७०, ग्रामीण १ लाख २० हजार ४८४, जिल्ह्याबाहेरील १ हजार १०३ अशी एकूण जिल्ह्यात ४ लाख २८ हजार ५३९ रुग्णांवर पोहोचली आहे. दिवसभरात शहरात ४०, ग्रामीणला २१, जिल्ह्याबाहेरील १० असे एकूण ७१ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोना बळींची संख्या ४ हजार ६८५, ग्रामीण १ हजार ९५८, जिल्ह्याबाहेरील १० अशी एकूण जिल्ह्यात ७ हजार ७४६ रुग्णांवर पोहोचली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सातत्याने नवीन रुग्ण व मृत्यू कमी होत असल्याचे सुखद चित्र आहे.

‘एसडीआरएफ’मधून ५० रुग्णवाहिका नागपूरला द्या -ठाकरे

शहरात करोना  रुग्णसंख्या बघता आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून रुग्णवाहिका देखील कमी पडत आहेत. तेव्हा राज्य सरकारने राज्य आपत्ती निवारण दल निधी (एसडीआरएफ)मधून नागपूरसाठी किमान ५० रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार विकास ठाकरे यांनी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना के ली. आमदार ठाकरे यांनी मंगळवारी वडेट्टीवार यांची भेट घेतली. शहरातील १० झोनमधील रुग्णांची संख्या, करोना केंद्र, शासकीय रुग्णालय, रुग्णवाहिका आणि शवाहिकांसंदर्भात चर्चा के ली. आरोग्य यंत्रणा अपुरी पडते आहे. रुग्णवाहिकांसाठी लोकांचे फोन येतात.   त्यामुळे एसडीआरएफमधून तातडीने किमान ५० रुग्णवाहिका नागपूर शहराला देण्यात याव्यात, असे विकास ठाकरे म्हणाले.

सात हजारांवर करोनामुक्त

शहरात ४ हजार ९१५, ग्रामीण २ हजार ४३४ असे एकूण ७ हजार ३४९ व्यक्ती करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या २ लाख ६३ हजार ४९८, ग्रामीण ८८ हजार ९६ अशी एकूण ३ लाख ५१ हजार ५४९ व्यक्तींवर पोहोचली आहे. आजपर्यंतच्या बाधितांच्या तुलनेत करोनामुक्तांचे प्रमाण ८२.०४ टक्के आहे.

साडेआठ हजार रुग्ण रुग्णालयांत

जिल्ह्यात अत्यवस्थ रुग्ण वाढल्याने एकेकाळी रुग्णालयांत दाखल रुग्णांची संख्या सव्वानऊ हजारांच्या जवळपास गेली होती. परंतु आता रुग्णालयांतील रुग्णसंख्याही कमी होताना दिसत आहे. मंगळवारी जिल्ह्यात ८ हजार ५१९ गंभीर संवर्गातील रुग्णांवर विविध कोविड रुग्णालय वा कोविड केअर सेंटरमध्ये तर ६० हजार ६८३ रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार सुरू होते.

२०.७२ टक्के अहवाल सकारात्मक

शहरात दिवसभरात १३ हजार ७७२, ग्रामीणला ५ हजार ६९६ अशा एकूण १९ हजार ४६८ चाचण्या झाल्या. त्याचा अहवाल बुधवारी अपेक्षित आहे. परंतु सोमवारी तपासलेल्या २० हजार १७८ नमुन्यांतील ४ हजार १८२ रुग्णांना करोना असल्याचे निदान झाले. त्यामुळे सकारात्मक अहवालाचे प्रमाण २०.७२ टक्के नोंदवले गेले.

खाटांची उपलब्धता

शहरातील खाजगी व शासकीय रुग्णालये मिळून बाधितांसाठी किती खाटा (बेड्स) उपलब्ध आहेत, याची माहिती  www.nmcnagpur.gov.in   वर  तसेच हेल्पलाईन  ०७१२-२५६७०२१ आणि २५५१८६६ यावर संपर्क साधल्यास उपलब्ध आयसीयू प्राणवायू, व्हेंटिलेटर, खाटांची माहिती प्राप्त होईल. मंगळवारी रात्री ८ वाजेपर्यंत प्राणवायू खाटा २४७ आणि प्राणवायू नसलेल्या खाटा ४५ उपलब्ध होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2021 12:04 am

Web Title: corona virus patient in nagpur akp 94
Next Stories
1 साडेचार लाखांचे अग्रीम घेतल्यावरही देयक देण्यास नकार!
2 रेमडेसिविरच्या काळाबाजार सुनावणीसाठी स्वतंत्र न्यायालय हवे
3 करोना मृत्यू संख्येत हनुमाननगर झोन पुढे
Just Now!
X