03 June 2020

News Flash

मेडिकल, मेयोत ६०० खाटांसाठी २५ कोटी ; जिल्हाधिकाऱ्यांची उच्च न्यायालयात माहिती

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ६०० विलगीकरण खाटांची व्यवस्था करण्यात येत आहेत.

संग्रहित छायाचित्र

नागपूर : करोना संकटाशी सामना करण्यासाठी  उपराजधानीतील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ६०० विलगीकरण खाटांची व्यवस्था करण्यात येत आहेत. तसेच अतिदक्षता विभागाकरिता आवश्यक तंत्रज्ञान व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून त्याकरिता केंद्र सरकारकडून २५ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्य़ातील उपाययोजनाच्या विषयावर बुधवारी न्या. अतुल चांदुरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले.

कामगार व मजुरांसाठी शहरात १० शिवभोजन थाळी योजना केंद्र सुरू आहेत. ग्रामीणमध्ये केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी ६०० खाटा व अतिदक्षता विभाग तयार करण्यासाठी केंद्र सरकारने मेयो आणि मेडिकलमध्ये २५ कोटी रुपये नागपूर जिल्हयाकरिता मंजूर केले आहेत. मेयो रुग्णालयात औषध व इतर साहित्य खरेदीसाठी १० कोटी रुपये मंजूर करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापनाकरिता ५ कोटी ४२ लाख मंजूर झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

कारागृहात १५ विलगीकरण वॉर्ड

करोनाग्रस्त व संशयितांच्या संपर्कात आलेल्या कैद्यांना स्वतंत्र ठेवण्यासाठी विदर्भातील प्रत्येक कारागृहात सुविधा निर्माण करण्यात आली आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहातील बराकींमध्ये १५ विलगीकरण वार्ड तयार करण्यात आले, असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद आहे.

व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सुनावणी

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात केवळ अत्यावश्यक प्रकरणांची सुनावणी सुरू आहे. या सुनावणीमध्येही सामाजिक अंतर राखण्यात येत आहे. बुधवारी उच्च न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सुनावणी झाली. न्यायाधीश एका कक्षात व वकिलांनी दुसऱ्या कक्षात व्हिडीओद्वारा वाद प्रतिवाद केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2020 12:11 am

Web Title: coronavirus 25 crore for 600 bed for government hospital in nagpur zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 संकट काळात खासगी शाळांकडून शुल्क सवलत नाही
2 Coronavirus : मेयोतील पाच डॉक्टरांसह १५ कर्मचारी विलगीकरणात!
3 Coronavirus : ‘मरकज’हून परतलेल्यांकडून बिर्याणीची मागणी!
Just Now!
X