आणखी एक बळी; ७४ नवीन बाधितांची भर

नागपूर : उपराजधानीत दिवसभऱ्यात आणखी ७४ नवीन करोना बाधितांची भर पडली असून मेडिकलमध्ये एकाचा मृत्यू नोंदवण्यात आला. दरम्यान येथील सर्व रुग्णालयांत प्रथमच सक्रिय करोना बाधितांची संख्या ७७७ वर पोहचली आहे.

दगावलेला ५१ वर्षीय रुग्ण रामेश्वरीचा आहे. दरम्यान जिल्ह्य़ात आता झपाटय़ाने करोनाग्रस्त वाढत आहेत. शहरातील विविध ठिकाणच्या झोपडपट्टय़ांमध्ये आतापर्यंत ४०० बाधित आढळले आहे. आता मृत्यूची संख्याही वाढत आहे. त्यातच नवीन बाधितांमध्ये शहरातील बोरियापुरातील १, न्यु इंदोरा १, काशी नगर १, विदर्भ प्रिमियर सोसायटी १, गोकुलपेठ १, रामदासपेठ २, डिप्टी सिग्नल ५, जुनी मंगळवारी १, शक्ती माता नगर १, खटिकपुरा (सदर) १, रिपब्लिक नगर १, मानकापूर १, टिमकी २, झिंगाबाई टाकळी जुनी वस्ती १, बंदेनवाज नगर १, मध्यवर्ती कारागृह १, गणपतीनगर १ आणि इतर  भागातील काही रुग्ण आहेत.

दिवसभऱ्यात तब्बल ७४ नवीन बाधित आढळल्याने आता  एकूण बाधितांची संख्या  २,३५७ वर पोहचली आहे. त्यातच शहरात होणारे करोनाचे मृत्यू ही नवीन चिंतेची बाब ठरत आहे. एप्रिल महिन्यात अवघे २ मृत्यू झाले होते.  मे महिन्यात ९, जून महिन्यात १४ तर जुलैच्या १३ दिवसात १२ जण दगावल्याची नोंद मेयो आणि मेडिकल या दोन्ही रुग्णालयांत करण्यात आली आहे.  दिवसभऱ्यात शहरात ४२ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे एकूण करोनामुक्तांची संख्या  १,५४५ वर पोहचली आहे.

कोव्हिड रुग्णालयातून दोन बाधित पसार

मेडिकलच्या कोव्हिड रुग्णालयातून रविवारी दोन करोना बाधित सुट्टी झालेल्या रुग्णांमध्ये शिताफीने सहभागी होऊन येथून पसार झाले. हा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनात येताच पोलिसांच्या मदतीने शोधाशोध सुरू झाली. यातला एक रुग्ण परतला असला तरी  कोंढाळीतील ५६ वर्षीय बाधिताचा अद्यापही पत्ता नाही

‘सारी’चे दोन बळी

मेडिकलमध्ये दिवसभऱ्यात ‘सारी’चे तीन मृत्यू नोंदवले गेले. यापैकी एकाचा करोना अहवाल सकारात्मक आला. दोघांचे अहवाल रात्री उशिरापर्यंत आले नव्हते. त्यामुळे तुर्तास ते ‘सारी’चे मृत्यू आहेत.

ग्रामीणमध्येही धोका वाढला

ग्रामीण भागातही करोनाचे रुग्ण वाढत असून सर्वाधिक बाधितांची संख्या हिंगण्यात आहे. तेथे आजपर्यंत १०० जण करोनाच्या विळख्यात सापडले  तर लोकमान्य नगर (डिगहोह) येथे एकाचा मृत्यू झाला. कामठीत २४ तासांत १८ नवीन बाधितांची नोंद झाली. त्यामुळे तेथील एकूण बाधितांची संख्या ८५ वर पोहचली आहे. कन्हान येथे एकाचा मृत्यू झाला. काटोल तालुक्यात आजपर्यंत ३६ रुग्ण आढळले आहेत. कळमेश्?वरमध्ये १४ तर सावनेरमध्ये १२ जण आढळले. रामटेक तालुक्?यात तिघांना तर उमरेड तालुक्?यात एकाला बाधा झाली. शिवाय राज्य राखीव पोलिस दलाचे आतापर्यंत १५ जण बाधित आढळले आहेत.