२४ तासांत १० मृत्यू; २०५ नवीन रुग्ण

नागपूर :  चार दिवसांपासून सातत्याने एकअंकी असलेली मृत्यूसंख्या सोमवारी पुन्हा दोनअंकी झाली. करोनामुळे सोमवारी १० जणांचा मृत्यू झाला तर २०५ नवीन रुग्णांची भर पडली.

दैनिक मृत्यूंमध्ये  शहरातील ४, ग्रामीणचे ३, जिल्हय़ाबाहेरील ३ अशा एकूण १० रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे आजपर्यंत शहरातील मृत्यूंची संख्या २ हजार ४५८, ग्रामीण ५८३, जिल्हय़ाबाहेरील ४३९ अशी एकूण ३ हजार ४८० वर पोहचली आहे. दिवसभरात शहरात १६४, ग्रामीणला ३८, जिल्हय़ाबाहेरील ३ अशा एकूण २०५ रुग्णांची भर पडली. त्यामुळे आजपर्यंतची शहरातील बाधितांची संख्या ८३ हजार ४६, ग्रामीण २१ हजार ४७८, जिल्हय़ाबाहेरील ६२१ अशी एकूण १ लाख ५ हजार १४५ वर पोहचली आहे.

दिवसभरात ३२५ करोनामुक्त

जिल्ह्य़ात दिवसभरात १९६, ग्रामीणला १२९ असे एकूण ३२५ व्यक्ती करोनामुक्त झाले आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ७८ हजार ११२, ग्रामीण २० हजार ३५० अशी एकूण ९८ हजार ४६२ वर पोहचली आहे.

गृह विलगीकरणात २,०७७ बाधित

शहरात सध्या २ हजार ४७६, ग्रामीणला ७२७ असे एकूण ३ हजार २०३ सक्रिय  रुग्ण आहेत. त्यातील ९२१ रुग्णांवर विविध रुग्णालयांत तर २ हजार ७७ बाधितांवर गृहविलगीकरणात उपचार सुरू आहेत.

विदर्भातील मृत्यू

(९ नोव्हेंबर)

जिल्हा                  मृत्यू

नागपूर                  १०

वर्धा                     ०१

चंद्रपूर                  ०२

गडचिरोली            ००

यवतमाळ              ०१

अमरावती             ०१

अकोला                ००

बुलढाणा              ०१

वाशीम                 ००

गोंदिया                 ०२

भंडारा                  ०१

एकूण                   १९