22 September 2020

News Flash

Coronavirus : पुन्हा उद्रेक.. २५ जणांचा मृत्यू! 

५३९ रुग्णांचा नवीन उच्चांक

प्रतिनिधिक छायाचित्र

५३९ रुग्णांचा नवीन उच्चांक

नागपूर : शहरात गुरुवारी पुन्हा करोनाचा मोठा उद्रेक झाला. या जीवघेण्या आजाराने तब्बल २५ जणांचा बळी घेतला. याशिवाय एकाच दिवसात  ५३९ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे शहरात एकूण करोनाबाधितांची संख्या ७,२९१ वर पोहचली असून मृतांचा आकडा २२९ वर गेला आहे.

मृत्यू झालेल्यांमध्ये मोमीनपुरा येथील ४४ वर्षीय पुरुष, कामठी येथील ६४ वर्षीय पुरुष, कळमेश्वर येथील २६ वर्षीय महिला,  पारडी येथील ६८ वर्षीय पुरुष, तेलंखेडी येथील  ६० वर्षीय महिलेसह इतर आणखी काही रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात गुरुवारी तब्बल ५३९ रुग्ण नवे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये २५१ ग्रामीणचे असून २८८ शहरातील आहेत. गुरुवारी मेयोत १०२, मेडिकलमध्ये १२५, एम्समध्ये ६८, निरीमध्ये ७५, माफसूत २५, अ‍ॅन्टीजन चाचणीत ८६ तर खासगी प्रयोगशाळेतील चाचणीत ५६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले.

मेडिकलमध्ये सध्या ३५२ जणांवर  उपचार सुरू असून मेयोत २८८ ,एम्समध्ये ४५ तर इतरत्रही अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. त्याशिवाय गुरुवारी दिवसभरात १५२ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आजवर बरे होणाऱ्यांची संख्या ४,०४८ वर पोहचली आहे. जिल्ह्यत बरे होण्याचे प्रमाण ५६ टक्के आहे.

रेल्वे नियंत्रण कक्षातील सात कर्मचारी बाधित

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नियंत्रण कक्षातील सात कर्मचारी गुरुवारी करोनाबाधित झाले. यामुळे गुरुवारी तातडीने कार्यालय रिकामे करून र्निजतुकीकरण करण्यात आले असून पुढील तीन दिवस कार्यालय बंद राहणार आहे. नागपूर रेल्वेस्थानकाला लागून डीआरएम कार्यालयाच्या शेजारी तीन मजली इमारतीत मध्य रेल्वे आणि दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या  नियंत्रण कक्षात सुमारे शंभर कर्मचारी काम करतात. गुरुवारी दोन मुख्य नियंत्रक, दोन स्टेशन मास्टर, एक कार्यालय अधीक्षक, एक इंजिनिअर कंट्रोल ट्रॅकमन यांना करोनाची लागण झाली. तिसऱ्या मजल्यावरही एक कर्मचारी बाधित झाला. यानंतर गुरुवारी दुपारी आणि शुक्रवारी कर्मचाऱ्यांना सुटी देण्यात आली. त्यानंतर शनिवार, रविवारी कार्यालयाला सुटी आहे, अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक शोभना बंडोपाध्याय यांनी सांगितले.

आजचे झोननिहाय रुग्ण 

लक्ष्मीनगर – १

धरमपेठ – ११

हनुमाननगर – ६

धंतोली – ११

नेहरूनगर – ९

गांधीबाग – ९

सतरंजीपुरा- ३

लकडगंज – ४

आशीनगर – २१

मंगळवारी – २०

महापौर गृहविलगीकरणात

बुधवारी करोनाबाधित कुटुंबातून एका सदस्याच्या संपर्कात आल्याने महापौर संदीप जोशी यांनी पुढील सात दिवस गृहविलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात ते कोणाशीही भेटणार नाहीत. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्यांनी हे पाऊल उचलले आहे. खुद्द जोशी यांनी ही माहिती समाजमाध्यमाद्वारे दिली आहे.

सेवन स्टार रुग्णालयाला नोटीस

करोना रुग्णांकडून अधिक रक्कम घेतल्याप्रकरणी जगनाडे चौकातील सेवन स्टार रुग्णालयाला महापालिकेने गुरुवारी नोटीस बजावली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 12:24 am

Web Title: coronavirus in nagpur 25 people died in nagpur due to coronavirus
Next Stories
1 पाणीपट्टीकरात पाच टक्के वाढ होणारच
2 मॉल सुरू, मग व्यायामशाळा का नाही?
3 राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मेळघाट रेल्वेचा विषय गाजणार!
Just Now!
X