23 October 2020

News Flash

Coronavirus : एका दिवसात ३६ टक्के बाधित 

केवळ २ हजार ७०० चाचण्या, तरी ९९४ रुग्ण; २४ तासांत ३८ जणांचा मृत्यू

केवळ २ हजार ७०० चाचण्या, तरी ९९४ रुग्ण; २४ तासांत ३८ जणांचा मृत्यू

नागपूर : जिल्ह्य़ात आज सोमवारी  केवळ २ हजार ७०१ चाचण्या झाल्या. यातही ३६.८० टक्के जणांना करोना असल्याचे निदान झाले. त्यामुळे कमी चाचण्यांत जिल्ह्य़ात उद्रेक झालेल्या करोनावर नियंत्रण मिळणार कसे, हा प्रश्न वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार उपस्थित करत आहेत. चाचण्या कमी होत असल्याने येथील करोना व्यवस्थापनावरच गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे.

आरोग्य मंत्र्यांनी नुकताच नागपूर, विदर्भाचा दौरा करत कमी चाचण्यांबद्दल अधिकाऱ्यांना सुनावले होते. पूर्ण क्षमतेने चाचण्या करण्याच्या मंत्र्यांच्या  सूचनेला आता नागपुरातच हरताळ फासला जात असल्याचे दिसत आहे. सोमवारी जिल्ह्य़ात केवळ २ हजार ७०१ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १ हजार ८५ आरटीपीसीआर तर १ हजार ५१६ रॅपिड अँटिजन चाचण्यांचा समावेश होता. एवढय़ा कमी चाचण्यानंतरही तब्बल ३६.८० टक्के अहवाल सकारात्मक आल्याने शहरात ९९४ नवीन बाधितांची भर पडली. त्यामुळे आरोग्य विभाग एकीकडे बाधित कमी होत असल्याचा दावा करत असले तरी दुसरीकडे चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण वाढल्याने वैद्यकीय क्षेत्रात चिंता वाढली आहे. नवीन बाधितांत शहरातील ७३४, ग्रामीणचे २४७, जिल्ह्य़ाबाहेरील ४ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या ६० हजार २९१, ग्रामीण १५ हजार १०७, जिल्ह्य़ाबाहेरील ४१७ अशी ७५ हजार ८१५ वर पोहचली आहे.

नागपुरात एकीकडे चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे सकारात्मक अहवाल येण्याचे प्रमाण वाढत असताना दुसरीकडे चाचण्यांची संख्या कमी  आहे. परंतु या विषयावर जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व इतरही खात्यातील करोनाशी संबंधित अधिकारी काहीही बोलायला तयार नाहीत. त्यामुळे चाचण्या कमी होण्याचे नेमके कारण काय, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

३,९३४ बाधित रुग्णालयांत

शहरात १० हजार ११६, ग्रामीणमध्ये ३ हजार ५८१ असे एकूण नागपूर जिल्ह्य़ात १३ हजार ६८० सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी ३ हजार ९३४ येथील विविध खासगी व शासकीय रुग्णालयांत उपचार घेत आहेत.  इतर ८,७५२ रुग्ण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत.

१,४३१ करोनामुक्त

सोमवारी शहरात १ हजार १५० तर ग्रामीणला २८१ असे एकूण १ हजार ४३१ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे   एकूण करोनामुक्तांची संख्या ५९ हजार ६९७ वर पोहचली आहे.

विदर्भातील

(२८ सप्टेंबर) मृत्यू

जिल्हा                   मृत्यू

नागपूर                    ३८

वर्धा                        ०३

चंद्रपूर                     ०५

गडचिरोली                  ००

यवतमाळ                  ०४

अमरावती                  ०५

अकोला                    ०१

बुलढाणा                    ०२

वाशीम                    ०२

गोंदिया                     ०५

भंडारा                      ०२

एकूण                       ६७

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2020 1:39 am

Web Title: coronavirus in nagpur 36 percent infected with coronavirus in one day zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 आता दर आठवडय़ाला गुरुजींचीच ‘शाळा’ भरणार
2 मिठाई विक्रेत्यांवर गुरुवारपासून करडी नजर राहणार
3 अपिलाची मुदत संपण्यापूर्वीच केलेला दुसरा विवाह न्यायालयाचा अवमान नाही
Just Now!
X