२४ तासांत १३ मृत्यू; ४०५ नवीन रुग्ण

नागपूर : जिल्ह्य़ात २४ तासांत करोनामुळे १३ रुग्णांचा मृत्यू झाला तर ४०५ नवीन रुग्णांची भर पडली. सलग दोन दिवस करोनामुक्तांहून नवीन बाधितांची संख्या  अधिक आढळल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

नवीन बाधितांमध्ये शहरातील ३५०, ग्रामीणचे ५०, जिल्हय़ाबाहेरील ५ अशा एकूण ४०५ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या ९० हजार ९२५, ग्रामीण २३ हजार २९४, जिल्हय़ाबाहेरील ७१२ अशी एकूण १ लाख १४ हजार ९३१ वर पोहचली आहे.  दिवसभऱ्यात शहरात ७, ग्रामीण १, जिल्हय़ाबाहेरील ५ असे एकूण

१३ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे आजपर्यंत शहरातील मृत्यूची संख्या २ हजार ५७३, ग्रामीण ६४५, जिल्हय़ाबाहेरील ५३० अशी एकूण ३ हजार ७४८ वर पोहचली आहे.  दिवसभऱ्यात शहरात ३१५, ग्रामीणला ४८ असे एकूण ३६३ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ८३ हजार ५२३, ग्रामीण २१ हजार ९९४ अशी एकूण १ लाख ५ हजार ५१७ वर पोहचली आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील करोनामुक्तांचे प्रमाण ९१.८० टक्क्यांवर आले आहे.

सक्रिय बाधितांची संख्या ५,६६६ वर

जिल्ह्य़ात दैनिक करोनामुक्तांहून नवीन करोनाबाधित  जास्त आढळू लागल्याने पुन्हा  सक्रिय बाधितांची संख्या वाढू लागली आहे. सोमवारी शहरात ४ हजार ८२९, ग्रामीणला ८३७ असे एकूण ५ हजार ६६६  सक्रिय  रुग्ण होते. त्यातील अकराशेच्या जवळपास रुग्णांवर विविध रुग्णालयांत तर सवा चार हजारांच्या जवळपास रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू होते.

विदर्भातील मृत्यू

(७ डिसेंबर)

जिल्हा                  मृत्यू

नागपूर                  १३

वर्धा                      ०३

चंद्रपूर                  ०४

गडचिरोली             ०३

यवतमाळ              ००

अमरावती              ०१

अकोला                ०२

बुलढाणा               ०१

वाशीम                ००

गोंदिया                ०४

भंडारा                 ०३

एकूण                 ३४