News Flash

करोनामुक्तांचे प्रमाण घसरून ७७.६० टक्क्यांवर

२४ तासांत ६९ मृत्यू; नवीन ५,८३८ रुग्ण

(संग्रहित छायाचित्र)

२४ तासांत ६९ मृत्यू; नवीन ५,८३८ रुग्ण

नागपूर : जिल्ह्य़ात २४ तासांत ६९ करोनाग्रस्तांचा मृत्यू झाला तर ५ हजार ८३८ नवीन रुग्णांची भर पडली. दैनिक करोनामुक्तांहून नवीन बाधितांची संख्या सातत्याने जास्त आढळत असल्याने जिल्ह्य़ातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांच्या तुलनेत करोनामुक्तांचे प्रमाण घसरून ७७.६० टक्यांवर आले आहे.

दिवसभरात शहरात २ हजार ७८८, ग्रामीण ४५९ असे एकूण ३ हजार २४७ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या १ लाख ७५ हजार १५७, ग्रामीण ४५ हजार ४०३ अशी एकूण २ लाख २० हजार ५६० व्यक्तींवर पोहोचली आहे. गेल्या अनेक महिन्यानंतर प्रथमच येथील करोनामुक्तांचे प्रमाण जिल्ह्य़ात ७७.६० टक्के कमी नोंदवले गेले. याशिवाय शहरात २४ तासांत ३ हजार ९१२, ग्रामीण १ हजार ७४४, जिल्ह्य़ाबाहेरील ५ असे एकूण ५ हजार ६६१ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या २ लाख १५ हजार ६२८, ग्रामीण ६७ हजार ४८९, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार १०० अशी एकूण २ लाख ८४ हजार २१७ रुग्णांवर पोहोचली आहे.

दिवसभरात शहरात ३७, ग्रामीण २७, जिल्ह्य़ाबाहेरील ५ असे एकूण ६९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या ३ हजार ६४१, ग्रामीण १ हजार २७९, जिल्ह्य़ाबाहेरील ९१८ अशी एकूण ५ हजार ८३८ रुग्णांवर पोहोचली आहे.

दिवसभरात रुग्णालयांत ८५४ रुग्ण वाढले

शहरात ३६ हजार ३३६, ग्रामीण २१ हजार २८३ असे एकूण जिल्ह्य़ात ५७ हजार ८१९ उपचाराधीन रुग्ण आहेत. त्यातील ५० हजार ५४० रुग्णांवर गृहविलगीकरणात  तर गंभीर संवर्गातील ७ हजार २७९ रुग्णांवर विविध कोविड रुग्णालय किंवा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासांत जिल्ह्य़ात ८५४ रुग्ण रुग्णालयांत वाढले, हे विशेष.

दिवसभरात १७,०४७ चाचण्या

शहरात दिवसभरात ११ हजार ४९४, ग्रामीण ५ हजार ५५३ असे एकूण १७ हजार ४७  चाचण्या झाल्या. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. काही तांत्रिक कारणांमुळे १२ आणि १४ एप्रिलला आरटीपीसीआर चाचण्या कमी राहणार असल्याचे महापालिकेकडून आधीच स्पष्ट करण्यात आले होते.

खाटांची माहिती संकेतस्थळावर

शहरातील खाजगी व शासकीय रुग्णालये मिळून बाधितांसाठी किती खाटा (बेडस) उपलब्ध आहे याची माहिती एका क्लिवर उपलब्ध होणार आहे. महापालिका  www.nmcnagpur.gov.in  व नागपूर स्मार्ट सिटीच्या संकेत स्थळ  http://nsscdcl.org/covidbeds वर क्लिक करुन माहिती घेता येईल. तसेच हेल्पलाईन  ०७१२-२५६७०२१ आणि २५५१८६६ यावर संपर्क साधल्यास उपलब्ध आई.सी.यू. ऑक्सीजन, व्हेंटिलेटर, खाटांची माहिती प्राप्त होईल. सोमवारी रात्री ८ वाजेपर्यंत शहरात ऑक्सिजन खाटा ९३ आणि नॉन ऑक्सिजन खाटा ४० उपलब्ध होत्या.

एम्समध्ये फक्त ७५० रुपयात सिटीस्कॅन

करोना रुग्णांसाठी एम्स रुग्णालयात (अखिल भारतीय आयुर्विज्ञान सस्था) सिटीस्कॅनची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी फक्त ७५० रुपये शुल्क आकारले जात आहेत. बाजारात यासाठी २५०० रुपये दर आहे, हे विशेष. एम्सच्या संचालिका डॉ. विभा दत्ता यांनी आज ही माहिती दिली. करोना रुग्णांसाठी सिटीस्कॅन आवश्यक आहे. गरीब व गरजू रुग्णांना बाजारातील  दर परवडत नाही, त्यामुळे अनेक रुग्ण सीटीस्कॅ न न करताच उपचार घेतात. त्यामुळे ही सुविधा सवलतीच्या दरात उपलब्ध व्हावी यासाठी एम्स हॉस्पिटल येथे केवळ ७५० रुपयात सीटीस्कॅ न सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सकाळी नऊ वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे करोना  रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एम्स व प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2021 1:56 am

Web Title: coronavirus in nagpur covid 19 recovery rate in nagpur zws 70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 दुप्पट भावाने मद्यविक्री
2 सर्वाधिक करोनाग्रस्त ३१ ते ४० वयोगटातील
3 महिला आयोग, ‘विशाखा’ समित्यांकडून न्याय मिळण्याची खात्री नाही!
Just Now!
X