२४ तासांत ४७ मृत्यू; नवीन ३,५७९ रुग्ण

नागपूर : जिल्ह्य़ात २४ तासांत ४७ करोना बाधितांचा मृत्यू झाला तर ३ हजार ५७९ नवीन रुग्णांची भर पडली. नववर्षांत प्रथमच एवढय़ा  रुग्णांच्या मृत्यूचा उच्चांक नोंदवण्यात आल्याने सर्वसामान्यांमध्ये चिंता वाढली आहे.

जिल्ह्य़ात २२ आणि २४ मार्च अशा दोन दिवशी प्रत्येकी ४० करोनाबाधितांचा मृत्यू नोंदवला गेला होता. यात शहरातील अनुक्रमे २१ आणि २६ मृत्यू  होते. परंतु गुरुवारी २४ तासांत एकूण ४७ मृत्यू झाले. त्यातील तब्बल ३३ मृत्यू शहरातील असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.  २४ तासांत ग्रामीणला १०, जिल्ह्य़ाबाहेरील ४ रुग्णांचेही मृत्यू नोंदवला गेले. नवीन मृत्यूंमुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूंची संख्या ३ हजार ६५, ग्रामीण ८८६, जिल्ह्य़ाबाहेरील ८३३ अशी एकूण ४ हजार ७८४ रुग्णांवर पोहचली आहे.  शहरात २ हजार ५९७, ग्रामीण ९७८, जिल्ह्य़ाबाहेरील ४ असे एकूण ३ हजार ५७९ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या १ लाख ६४ हजार २४९, ग्रामीण ४१ हजार ८०३, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार १५ अशी एकूण २ लाख ७ हजार ६७ रुग्णांवर पोहचली आहे.  दिवसभरात शहरात १ हजार ८७५, ग्रामीण ४१० असे एकूण २ हजार २८५ व्यक्ती करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या १ लाख ३५ हजार ४५२, ग्रामीण ३२ हजार १२ अशी एकूण १ लाख ६७ हजार ४६४ व्यक्तींवर पोहचली आहे.  करोनामुक्तांचे प्रमाण ८०.८७ टक्के आहे.

सकारात्मक अहवालाच्या संख्येत घट

शहरात दिवसभरात १० हजार ९४१, ग्रामीण ५ हजार १२३ अशा एकूण १६ हजार चाचण्या झाल्या. त्यांचा अहवाल शुक्रवारी अपेक्षित आहे. दरम्यान, जिल्ह्य़ात बुधवारी तपासलेल्या १७ हजार १५५ नमुन्यांतील ३ हजार ५७९ व्यक्तींना करोना असल्याचे निदान झाल्याने सकारात्मक अहवालाचे प्रमाण गेल्या काही दिवसांच्या तुलनेत कमी म्हणजे २०.८६ टक्के आहे.

सक्रिय रुग्ण ३५ हजारांच्या उंबरठय़ावर

शहरात २६ हजार ४७४, ग्रामीण ८ हजार ३४५ असे एकूण ३४ हजार ८१९ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील गंभीर संवर्गातील ४ हजार ४७७ रुग्णांवर विविध कोविड रुग्णालय वा कोविड केअर सेंटरमध्ये   तर २६ हजार ७८३ रुग्णांवर गृह विलगीकरणात  उपचार सुरू आहेत.