२४ तासांत २२ मृत्यू; ९७६ नवीन रुग्ण

नागपूर : जिल्ह्य़ात सलग १७ दिवस नवीन करोनाबाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक होती. परंतु आज बुधवारी जिल्ह्य़ात दिवसभरात ९७६ नवीन करोनाबाधित  आढळले. ही संख्या आज करोनामुक्त झालेल्या ८३५ जणांच्या तुलनेत अधिक होती.

१९ सप्टेंबरला जिल्ह्य़ात १ हजार ६२९ नवीन बाधित आढळले व १ हजार ५५० जण करोनामुक्त झाले. त्यानंतर कालपर्यंत सलग नवीन बाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक होती. परंतु आज ७ ऑक्टोबरला पुन्हा करोनामुक्तांच्या तुलनेत नवीन बाधितांची संख्या अधिक झाली.

जिल्ह्य़ात बुधवारी आढळलेल्या नवीन ९७६ बाधितांमध्ये शहरातील ७६३, ग्रामीणचे २०९, जिल्ह्य़ाबाहेरील ४ रुग्णांचा समावेश होता. याशिवाय २४ तासांत नोंदवलेल्या २२  मृत्यूंमध्ये शहरातील १४, ग्रामीणचे ४, जिल्ह्य़ाबाहेरील ४ रुग्णांचा समावेश आहे.

करोनामुक्तांची संख्या ७१ हजार पार

जिल्ह्य़ात आजपर्यंत ५७ हजार ४३९ तर ग्रामीण भागात १४ हजार १६३ असे एकूण ७१ हजार ६०२ व्यक्ती करोनामुक्त झाले आहेत. आज बुधवारी दिवसभरात शहरातील ५४१, ग्रामीण २९४ असे एकूण ८३५ जण करोनामुक्त झाले.  करोनामुक्तांचे प्रमाण सध्या ८५.१६ टक्के आहे.

विदर्भातील

(०७ सप्टेंबर) मृत्यू

जिल्हा                  मृत्यू

नागपूर                   २२

वर्धा                      ०२

चंद्रपूर                   ०२

गडचिरोली             ००

यवतमाळ               ०१

अमरावती              ०३

अकोला                 ०२

बुलढाणा               ००

वाशीम                  ०१

गोंदिया                  ०१

भंडारा                   ०४

एकूण                   ३८