25 February 2021

News Flash

चाचण्या घटल्याने करोनाबाधितांची संख्याही कमी!

केवळ ३ हजार ५४८ चाचण्या झाल्या. त्यामुळे  नवीन बाधितांची संख्याही कमी दिसत आहे.

संग्रहीत

२४ तासांत ९ मृत्यू; २७८ नवीन रुग्ण

नागपूर : जिल्ह्य़ात मंगळवारी  केवळ ३ हजार ५४८ चाचण्या झाल्या. त्यामुळे  नवीन बाधितांची संख्याही कमी दिसत आहे. २४ तासांत जिल्ह्य़ात ९  रुग्णांचा मृत्यू झाला, तर २७८ नवीन रुग्णांची भर पडली.

जिल्ह्य़ात झालेल्या ३ हजार ५४८ चाचण्यांमध्ये शहरातील २ हजार ७८२, ग्रामीणच्या ७६६ चाचण्यांचा समावेश आहे.  चाचण्या घटल्याने २४ तासांत शहरात २२३, ग्रामीण ५१, जिल्ह्य़ाबाहेर ४ असे एकूण २७८ रुग्ण नोंदवले गेले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या १ लाख ३ हजार ९३१ रुग्णांवर पोहोचली.  दिवसभरात शहरात ४, ग्रामीण १, जिल्ह्य़ाबाहेरील ४ असे एकूण ९ मृत्यू झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या २ हजार ७०३, ग्रामीण ७२७, जिल्ह्य़ाबाहेरील ६६० अशी एकूण ४ हजार ९० रुग्णांवर पोहोचली आहे.  दिवसभरात शहरात ३९०, ग्रामीण ३२ असे एकूण ४२२ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ९८ हजार ४१८, ग्रामीण २४ हजार ५८२ अशी एकूण १ लाख २३ हजारांवर पोहोचली आहे.

शहरातील सक्रिय बाधितांची संख्या आता २ हजार ८१०, ग्रामीण ९९७ अशी एकूण ३ हजार ८०७ वर पोहोचली आहे. एकूण रुग्णांतील ७३८ गंभीर  रुग्णांवर विविध रुग्णालयांत तर २ हजार ७९१ रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत.

विदर्भातील मृत्यू

(१९ जानेवारी)

जिल्हा                        मृत्यू

नागपूर                        ०९

वर्धा                             ००

चंद्रपूर                           ०१

गडचिरोली                    ००

यवतमाळ                      ००

अमरावती                     ००

अकोला                         ०१

बुलढाणा                       ०१

वाशीम                         ००

गोंदिया                         ००

भंडारा                          ००

एकूण                           १२

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2021 12:54 am

Web Title: coronavirus in nagpur nnagpur city records 278 covid 19 cases zws 70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील हृदय प्रत्यारोपण केंद्राला मंजुरी
2 ‘भंडारा रुग्णालयातील आग शॉर्ट सर्किटमुळेच’
3 विदर्भात काँग्रेस आणि भाजपला समान यश
Just Now!
X