News Flash

Coronavirus : रुग्णालयांत दाखल रुग्णसंख्या पाचशेहून कमी

शहरात २ हजार १६, ग्रामीणला ३४० असे एकूण जिल्ह्य़ात २ हजार ३५६  उपचाराधीन रुग्ण आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

२४ तासांत १० मृत्यू; ९१ रुग्णांची भर

नागपूर : जिल्ह्य़ात २४ तासांत १० करोना बाधितांचा मृत्यू झाला तर ९१ नवीन रुग्णांची भर पडली. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नवीन रुग्णांच्या तुलनेत करोनामुक्तांची संख्या अधिक असल्याने गुरुवारी जिल्ह्य़ात रुग्णालयांत दाखल रुग्णांची संख्याही दुसऱ्या लाटेनंतर प्रथमच ५०० हून खाली आली.

शहरात २ हजार १६, ग्रामीणला ३४० असे एकूण जिल्ह्य़ात २ हजार ३५६  उपचाराधीन रुग्ण आहेत. त्यातील गंभीर संवर्गातील ४७१ रुग्ण विविध कोविड रुग्णालय वा कोविड केअर सेंटरमध्ये  तर १ हजार ८८५ रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार सुरू आहेत. २४ तासांत शहरात नवीन ४९ रुग्ण, ग्रामीणला ३८, जिल्ह्य़ाबाहेरील ४ असे एकूण् ९१  रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या  रुग्णांची संख्या ३ लाख ३२ हजार १४, ग्रामीण १ लाख ४२ हजार ५७८, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार ५८७ अशा एकूण ४ लाख ७६ हजार १७९ रुग्णांवर पोहोचली. दिवसभरात शहरात ५, ग्रामीणला १, जिल्ह्य़ाबाहेरील ४ असे एकूण १०  मृत्यू झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतची मृत्यूसंख्या ५ हजार २८३, ग्रामीण २ हजार ३००, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार ४०५ रुग्णांवर पोहोचली. दरम्यान, शहरात दिवसभऱ्यात ७ हजार ८८१, ग्रामीण २ हजार ८६८ अशा एकूण १० हजार ७४९  चाचण्या झाल्या.

सर्वाधिक ९० रुग्ण मेडिकलमध्ये 

जिल्ह्य़ातील विविध कोविड रुग्णालय वा कोविड केअर सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक गंभीर संवर्गातील ९० रुग्ण मेडिकलमध्ये आहेत. त्यानंतर मेयो रुग्णालयात ४५, एम्समध्ये २२, पाचपावली कोविड रुग्णालयात १४, मेडिट्रिना रुग्णालयात १०, आमदार निवासातील कोविड केअर सेंटरमध्ये १८, कामठीतील आशा रुग्णालयात ११ तर इतरही बऱ्याच रुग्णालयांत एक आकडी रुग्ण दाखल आहेत.

२५ दिवस जीवनरक्षण प्रणालीवर असलेली महिला बरी

करोनाचे रुग्ण जीवनरक्षण प्रणालीवर (व्हेंटिलेटर) गेल्यास त्यांच्या वाचण्याचे प्रमाण कमी असते. परंतु योग्य उपचार व व्यवस्थापनाने हे रुग्णही वाचत असल्याचे स्पष्ट झाले आहे. क्रिम्स रुग्णालयात उपचार घेणाऱ्या स्वप्ना रासिक या ३५ वर्षीय महिलेलाही हा अनुभव आला. तिची प्रकृती करोनाने खालवल्यावर तिला जीवनरक्षण प्रणालीवर ठेवण्यात आले. २५ दिवसांनी ती त्यातून बाहेर आली. तिच्यावर येथे एकूण ४५ दिवस उपचार चालले.

१० जुनला घरी परत जातांना तिने ज्येष्ठ श्वसनरोग प्रमुख डॉ. अशोक अरबट यांच्यासह येथील चमूचे आभार मानले.

करोनामुक्तांचे प्रमाण ९७.६२ टक्के

शहरात दिवसभरात १९१, ग्रामीणला २१० असे एकूण  ४०१ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ३ लाख २५ हजार ३०१, ग्रामीण १ लाख ३९ हजार ५३४ अशी एकूण जिल्ह्य़ात ४ लाख ६४ हजार ८३५ व्यक्तींवर पोहोचली. आजपर्यंतच्या करोनाग्रस्त रुग्णांच्या तुलनेत  करोनामुक्तांचे प्रमाण ९७.६२ टक्के आहे.

विदर्भात  २५ मृत्यू, ६६७ नवीन रुग्ण

विदर्भातील अकरा जिल्ह्य़ांत गुरुवारी  ६६७ नवीन रुग्ण आढळले तर दिवसभरात येथे २५ रुग्णांचा मृत्यू झाला. नागपूर शहरात २४ तासांत ५, ग्रामीण १, जिल्ह्य़ाबाहेरील ४ अशा एकूण १० रुग्णांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्य़ात दिवसभरात ९१ नवीन रुग्ण आढळले. विदर्भातील एकूण मृत्यूत नागपूर जिल्ह्य़ातील ४० टक्केमृत्यूंचा समावेश आहे. अमरावतीत ४ मृत्यू तर १२६ नवीन रुग्ण, चंद्रपूरला २ मृत्यू तर ८८ रुग्ण, गडचिरोलीत २ मृत्यू तर ५१ रुग्ण, यवतमाळला २ मृत्यू तर ३० रुग्ण, भंडाऱ्यात ० मृत्यू तर ४ रुग्ण, गोंदियात ० मृत्यू तर १९ रुग्ण, वाशीमला ३ मृत्यू तर ७५ रुग्ण, अकोल्यात १ मृत्यू तर ८१ रुग्ण, बुलढाण्यात १ मृत्यू तर ४२ रुग्ण, वर्धा जिल्ह्य़ात ० मृत्यू तर ६० नवीन रुग्ण आढळले.

म्युकरमायकोसिसचाही प्रभाव ओसरतोय

विदर्भात करोनानंतर ‘म्युकरमायकोसिस’चेही (काळी बुरशी) सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्य़ात आढळत होते. येथे रोज वीसहून अधिक नवीन रुग्ण व मृत्यूसंख्याही पाच ते दहा दरम्यान राहत होती. परंतु गेल्या दोन दिवसांत जिल्ह्य़ात या आजाराचे २ मृत्यू व २५ रुग्ण आढळल्याने या आजाराचाही प्रभाव ओसरत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. जिल्ह्य़ात गेल्या दोन दिवसांमध्ये  म्युकरमायकोसिसचे २ मृत्यू तर नवीन २५ रुग्णांची भर पडली. त्यामुळे या आजाराच्या जिल्ह्य़ातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या १२५ तर रुग्णसंख्या

१ हजार ३३५ रुग्णांवर पोहोचली आहे. दगावलेल्या रुग्णांमध्ये जिल्ह्य़ांतील शासकीय रुग्णालयांतील  २५, खासगीच्या १०० अशा एकूण १२५ रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत शासकीय रुग्णालयांत ४२४ तर खासगी रुग्णालयांत ९११ असे एकूण १ हजार ३३५ रुग्ण आढळले आहेत. एकूण रुग्णांपैकी २४२ रुग्णांवर शासकीय रुग्णालयांत तर ७१८ रुग्णांवर खासगी रुग्णालयांत अशा एकूण ९६० रुग्णांवर शस्त्रक्रिया झाली. उपचारानंतर शासकीय रुग्णालयांतून १०७, खासगी रुग्णालयांतून ६०६ अशा एकूण ७१३ रुग्णांना  सुट्टी देण्यात आली. सध्या शासकीय रुग्णालयांत २६८, खासगी रुग्णालयांत २१८ अशा एकूण ४८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 2:16 am

Web Title: coronavirus nagpur reports 91 fresh cases 10 death zws 70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 महापालिकेत औषधांचा कोटय़वधींचा गैरव्यवहार
2 दोन महिन्यांत रस्त्यांवर दोन हजारांवर खड्डे
3 जिल्ह्यात चार दिवस पावसाचे
Just Now!
X