05 July 2020

News Flash

coronavirus : करोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू

*  मृतांमध्ये अमरावती, मध्यप्रदेशचा रुग्ण * शहरात आणखी १३ नवीन बाधितांची भर

(संग्रहित छायाचित्र)

*  मृतांमध्ये अमरावती, मध्यप्रदेशचा रुग्ण * शहरात आणखी १३ नवीन बाधितांची भर

नागपूर : उपराजधानीत गुरुवारी १३ नवीन करोनाबाधितांची भर पडली. तर अमरावती आणि मध्यप्रदेश येथील बाधितांचा नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील करोनाबळींची संख्या १३ वर पोहचली आहे.

मेडिकलला दगावलेल्या रुग्णामध्ये अमरावतीच्या रुक्मिणीनगर येथील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्यांना सारीचा आजार होता. प्रकृती दिवसेंदिवस खालवत असल्याने त्यांना ३ जूनला नागपूरच्या मेडिकलला हलवण्यात आले होते. चाचणीत त्यांना करोना असल्याचे समजले. उपचारादरम्यान त्यांचा ४ जूनला सकाळी ६ वाजता मृत्यू झाला. तर मध्यप्रदेशच्या सागर येथील एका ६२ वर्षीय सारी असलेल्या महिलेला अत्यवस्थ अवस्थेत मेडिकलला ३ जूनला आणले होते. चाचणीत त्यांनाही विषाणूची बाधा असल्याचे पुढे आले. उपचारादरम्यान तिचाही गुरुवारी मृत्यू झाला.

दोन्ही रुग्ण बाहेरचे असले तरी त्यांचे नमुने मेडिकलला घेऊन चाचणी अहवाल सकारात्मक आल्याने हे मृत्यू नागपूर जिल्ह्य़ांत मोजले जाणार आहे. जिल्ह्य़ाच्या बाहेरील अत्यवस्थ रुग्णांना नागपूरच्या मेडिकल, मेयोत वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असतानाही येथे हे मृत्यू नोंदवण्यात आल्यावर येथील मृत्यूदर जास्त दिसत असल्याने अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या दोन मृत्यूमुळे जिल्ह्य़ात आजपर्यंत करोनाने दगावणाऱ्यांची संख्या १३ झाली आहे. दरम्यान, शहरात दिवसभरात टिमकी भानखेडातील ९, ताकिया मोमीनपुरा- १ आणि अकोला आणि इतर ठिकाणचे मेडिकलला दाखल असलेले दोन रुग्ण, सिंबॉयसिस येथे विलगीकरणात असलेले एक अशा एकूण १३ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे नागपुरातील एकूण बाधितांची संख्या थेट ६२६ झाली आहे. पैकी यशस्वी उपचाराने आतापर्यंत ४०८ जण करोनामुक्त झालेत. येथे झालेले १३ मृत्यू वगळून इतरांवर मेडिकल, मेयो, एम्समध्ये उपचार सुरू आहे.

एका डॉक्टरसह आठ आरोग्य कर्मचारी विलगीकरणात

मेडिकलच्या शल्यक्रिया विभागात एक रुग्ण मंगळवारी उपचारासाठी आला होता. दुसऱ्या दिवशीच्या चाचणीत त्याला करोना असल्याचे निदान झाले. त्याच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्याने मेडिकलच्या १ डॉक्टर, १ मदतनीस, १ परिचर असे तिघांना रुग्णालयातच सक्तीच्या विलगीकरणात घेण्यात आले. तर अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या इतर पाच आरोग्य कर्मचाऱ्यांना गृह विलगीकरणात ठेवले आहे.

बजाजनगर, गांधीबाग प्रतिबंधित क्षेत्र

बजाजनगर व गांधीबाग परिसरात करोनाबाधित आढळल्यानंतर या परिसरातील मार्ग गुरुवारी सकाळी बंद करण्यात आले आहे. करोनाच्या सुरुवातीच्या काळात बजाजनगरात बाधित आढळला असताना त्यावेळी परिसर बंद केला नव्हता. मात्र या भागातील एका रुग्णालयात रुग्ण आढळताच परिसर बंद करण्यात आला आहे. दरम्यान, उमरेड मार्गावरील निराला सोसायटी व ताजबाग आझाद कॉलनी येथे एकही रुग्ण नसल्यामुळे येथील प्रतिबंध हटवून हा भाग मोकळा करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2020 1:37 am

Web Title: coronavirus pandemic 2 more deaths in nagpur zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 संचारबंदी शिथिल होताच उपराजधानीत हत्यासत्र
2 प्रशासन व लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय ठेवा
3 .. अन् बासू चटर्जी यांनी माझी कथा निवडली!
Just Now!
X