News Flash

Coronavirus : उद्घाटनानंतरही ‘माफसू’त करोना तपासणी नाही!

पशुसंवर्धन मंत्र्यांकडून नुसतेच उद्घाटन

प्रतिकात्मक फोटो

पशुसंवर्धन मंत्र्यांकडून नुसतेच उद्घाटन

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : नागपूरसह विदर्भात करोनाचे रुग्ण वाढल्याने एकीकडे संशयितांचे नमुने प्रयोगशाळांमध्ये येण्याचे प्रमाण वाढले असताना दुसरीकडे या तपासणींना मर्यादा आहेत. ती वाढवण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी सात दिवसांपूर्वी (९ एप्रिल) नागपूरच्या पशु व मत्स्य विद्यापीठात करोना चाचणी प्रयोगशाळेचे उद्घाटन केले होते. परंतु संच,  सुरक्षेची आवश्यक साधने येथे न दिल्याने येथील तपासणी सुरू झालेली नाही.

मेयो  येथील  प्रयोगशाळेत करोना तपासणी सर्वप्रथम सुरू झाली. येथे २४ तास तपासणी सुरू केल्यावरही दिवसाला १०० ते ११० नमुनेच तपासले जात होते. येथे संपूर्ण विदर्भासह मध्यप्रदेश व छत्तीसगडच्याही काही जिल्ह्य़ांचा भार होता. कालांतराने अखिल भारतील आयुर्विज्ञान संस्था (एम्स) आणि त्यानंतर  मेडिकल येथे  प्रयोगशाळा सुरू झाल्या. त्यामुळे नागपुरातील तिन्ही प्रयोगशाळेत रोजच्या करोनाशी संबंधित करोना तपासणीची क्षमता दिवसाला थेट २५० ते २७५ च्या जवळपास पोहचली.

पशु व मत्स्य विद्यापीठाकडेही जनुकीय प्रयोगशाळा असून येथे करोना चाचणीसाठी आवश्यक पीसीआर यंत्र होते. या प्रयोगशाळेत करोना चाचणी करण्याला

८ एप्रिलच्या दरम्यान आयसीएमआर संस्थेकडून मंजुरी मिळताच ९ एप्रिलला पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते येथील करोना प्रयोगशाळेचे उद्घाटन केले गेले.

त्यानंतर शहरात सातत्याने करोनाचे रुग्ण व संपर्कातील व्यक्ती, लक्षणे असलेल्या व्यक्तींची संख्या वाढल्याने तातडीने प्रयोगशाळेत तपासणी सुरू होणे अपेक्षित होते. परंतु नमुन्यांची संख्या वाढल्यावरही अद्याप या प्रयोगशाळेला आवश्यक संच आणि तपासणी करणाऱ्यांना संसर्गापासून वाचवण्यासाठी वैयक्तिक सुरक्षा संच (पीपीई किट) उपलब्ध करण्यात आले नाही.  परिणामी येथे अद्याप तपासणी सुरू झालेली नाही.

मेयोत तंत्रज्ञांना प्रशिक्षण

उपराजधानीतील पशु व मत्स्य विद्यापीठाच्या जणुकीय चाचणी प्रयोगशाळेतील तज्ज्ञ डॉक्टरांसह तंत्रज्ञांना  मेयोतील तपासणी केंद्रात करोना चाचणीबाबत प्रशिक्षित करण्यात आले होते.  परंतु अद्याप तपासणी सुरू नसल्याने सगळे जण आवश्यक साहित्याच्या प्रताक्षेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 12:23 am

Web Title: coronavirus test not yat started at animal and fisheries university of nagpur zws 70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 न्या. झका हक यांची अखेर उपराजधानीतच बदली
2 कुंभार बांधवांचा व्यवसाय टाळेबंदीमुळे गेल्या महिन्याभरापासून अडचणीत
3 ‘त्या’ बलात्कार पीडितेची प्रसूती होऊन बाळ दगावले
Just Now!
X