26 February 2021

News Flash

महापालिकेत सर्वपक्षीय ८७ ‘मौनीबाबा’!

नगरसेवकांना त्यांच्या भागातील प्रश्न मांडण्यासाठी महापालिकेची सर्वसाधारण सभा बोलाविली जाते.

साडेचार वर्षांत महासभेत एकही लेखी प्रश्न विचारला नाही

जनतेचे प्रश्न महापालिकेच्या सभागृहात मांडून त्यांचे निराकरण करणे हे लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येक नगरसेवकाचे कर्तव्य ठरते. मात्र, एकदा निवडून गेल्यावर लोकांशी आपले काही देणे-घेणे नाही, अशी समज करून साडेचार वर्षांत आपल्या भागातील समस्यांबाबत सभागृहात एकही लेखी प्रश्न न विचारणारे तब्बल ८७ नगरसेवक आहेत. या सर्वपक्षीय ‘मौनीबाबां’मध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे. पुढील वर्षी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत यातील अनेक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

नगरसेवकांना त्यांच्या भागातील प्रश्न मांडण्यासाठी महापालिकेची सर्वसाधारण सभा बोलाविली जाते. शहरात कोणकोणत्या समस्या आहेत आणि प्रशासनाकडून त्या सोडविण्याच्या दिशेने कोणती पावले उचलली जात आहेत याचा उहापोह या सभेत होत असतो.

मात्र, अनेक वेळा नगरसेवक या संधीचा लाभच उठवित नाहीत. सभेला उपस्थिती नोंदवून आपला ‘भत्ता’ सुरक्षित ठेवणारे नगरसेवक सभागृहात मात्र जनतेच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष या पदांवर असताना बोलण्याची संधी मिळत नाही, पण अन्यवेळी नगरसेवक म्हणून त्यांना आपल्या वस्त्यांतील समस्या मांडण्याची संधी असते.

माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारातून प्राप्त केलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०१२ ते ३० एपिल २०१६ या काळात झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण

सभांमध्ये  ८७ सदस्यांनी सभागृहात ‘मौनीबाबां’ची भूमिका बजावली आहे. यात प्रामुख्याने माजी महापौर अनिल सोले, माया इवनाते, सुनील अग्रवाल, माजी उपमहापौर संदीप जाधव, माजी स्थायी समिती अध्यक्ष रमेश सिंगारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश गजभिये, उपमहापौर मुन्ना पोकुलवार यांच्यासह विविध राजकीय पक्षांतील सदस्यांचा समावेश आहे.

आमदार अनिल सोले आणि प्रकाश गजभिये हे विधान परिषदेवर गेल्यानंतर त्यांची महापालिकेच्या सभांना उपस्थिती कमी झाली.

दर महिन्यात सर्वसाधारण सभा आणि काही विशेष सभा आयोजित केली जाते.  प्रत्येक सभेची कार्यक्रम पत्रिका तयार केली जाते. त्यात सदस्यांकडून प्रश्न मागविले जातात. सदस्य स्वत: ते देऊ शकतात. त्यानंतर सभागृहात त्यावर चर्चा होणे अपेक्षित असते.

– लेखाजोखा –

एकूण सदस्य – १४५

सर्वसाधारण सभा -४३

विशेष सभा -११

लेखी प्रश्न न विचारणारे सदस्य – ८७

पक्षनिहाय सदस्यांची नावे

भाजप – सुषमा चौधरी, भाग्यश्री कानतोडे, संगीता गिऱ्हे, रामदास गुळधे, सुनील अग्रवाल, साधना बरडे, संदीप जाधव, मीना चौधरी, माया इवनाते, लता घाटे, जैतुनबी अशफाक, कल्पक भनारकर, संगीता कळमकर, नरेंद्र (बाल्या) बोरकर, सरिता कावरे, अनिता वानखेडे, सुलोचना कोवे, चेतना टांक, अनिल धावडे, विद्या कान्हेरे, प्रवीण नरड, मनीषा कोठे, नीता ठाकरे, दिव्या धुरडे, डॉ. रवींद्र भोयर, सारिता नांदूरकर, डॉ. सफलता आंबटकर, मीना चौधरी, विशाखा मैंद, अनिल सोले, अश्विनी जिचकार, नीलिमा बावणे, उषा निशितकर, सरिता तिवारी, रिता मुळे, स्वाती आखतकर, सुमित्रा जाधव, शरद बांते, रमेश सिंगारे, जयश्री वाडिभस्मे, पल्लवी बावनकुळे, नामनियुक्त सदस्य प्रकाश राऊत,

  • काँग्रेस – शीला मोहोड, डॉ. प्रशांत चोपडा, राजू थुल, बाबा रवींदर कौर, केशवराव बोकडे, सिंधू उईके, पुष्पा निमजे, देवा उसरे, सरस्वती सलामे, इफ्तीखार अशरफू, कुमुदिनी कैकाडे, पद्मा उईके, निमिषा शिर्के, अमान उल्लाह खान, दीपक कापसे, शीला तराळे, उज्ज्वला बनकर, पुरुषोत्तम हजारे, विद्या लोणारे, प्रेरणा कापसे, रेखा बाराहाते. राजश्री पन्नासे, उज्ज्वला बनकर.
  • बसपा – अभिषेक शंभरकर, हर्षला जयस्वाल, ललिता पाटील, सागर लोखंडे, सत्यभामा लोखंडे, शबाना परवीन मो. जमाल,
  • राष्ट्रवादी काँग्रेस – प्रकाश गजभिये, दुनेश्वर पेठे, सीमा राऊत.
  • मनसे – विजया खोब्रागडे, श्रावण खापेकर,
  • भारिप- राजू लोखंडे, भावना ढाकणे,
  • मुस्लीम लिग- ईशरत नाहीद मो. जलील, अपक्ष – मुन्ना पोकुलवार, गोपीचंद कुमरे, रवींद्र डोळस,
  • रिपाइं आठवले – राजू बहादुरे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2016 4:13 am

Web Title: corporater issue in nagpur municipal corporation
Next Stories
1 उपराजधानीतील उष्माघाताचे मृत्यू कमी करण्याचा पेच!
2 जपानी गार्डनमधील झाडांना चुकीची नावे!
3 लोकजागर : भ्रष्टाचारालाही प्रतिष्ठा..?
Just Now!
X