ग्रामीण पोलीस मुख्यालयासमोर गोळीबार प्रकरण

उत्तर नागपुरातील टोळी युद्धातून पाटणकर चौकातील पोलीस मुख्यालयाच्या समोर गोळीबार करणे आणि खुनाचा प्रयत्न करण्याच्या आरोपातून कुख्यात लिटील सरदार आणि त्याच्या पाच साथीदारांची विशेष मोक्का न्यायालयाने निर्दोष सुटका केली. या निकालामुळे पोलिसांना मोठा धक्का बसला असून पोलिसांच्या मोक्का मोहिमेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहेत.

Narayan Rane case, Vinayak Raut, Parab,
२००५ नारायण राणेंच्या सभेतील गोंधळाचे प्रकरण : विनायक राऊत, परब, सावंत, देसाई, रवींद्र वायकर यांची निर्दोष सुटका
After the EPS-95 pensioners the Halba community also upset with BJP
इपीएस-९५ पेन्शनधारकानंतर ‘हलबा’ बांधवही सत्ताधाऱ्यांवर नाराज; म्हणाले, “भाजपला…”
Arvind kejriwal
केजरीवाल तिहार जेलमध्ये रामायणासह पंतप्रधानांबाबतचं ‘हे’ पुस्तक वाचणार, न्यायालयाकडे ‘या’ वस्तूंसाठी परवानगी अर्ज
Morbi bridge
१३५ जणांचा जीव घेणाऱ्या मोरबी पूल दुर्घटनेतील आरोपीला अखेर जामीन, पण कोर्टाने घातल्या ‘या’ अटी

सोनूसिंग गौर, रजितसिंग गौर, निरवेरसिंग टांक, हरविंदरसिंग भाटीया आणि परमजित सिंग भाटीया सर्व रा. अशोक चौक अशी निर्दोष सुटका करण्यात आलेल्या लिटील सरदारच्या इतर साथीदारांची नावे आहेत. ३१ मार्च २०१५ ला रात्री लिटीलचा मेहुणा रिंकू भाटिया हा इंदोरा चौकातील आयनॉक्स तुली मॉलमध्ये चित्रपट बघण्यासाठी गेला होता. त्यावेळी दुसऱ्या टोळीतील जोगराजसिंगला त्याचा धक्का लागला. त्यावेळी जोगराजसिंग हा आपल्या साथीदारांसह होता. दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर रिंकूने लिटीलला भ्रमणध्वनी करून घटनास्थळी बोलवून घेतले.

लिटील हा आपल्या पाच साथीदारांसह घटनास्थळी पोहोचला. त्यांच्या हातामध्ये त्यावेळी तलवार आणि बेसबॉल खेळण्याचे दंडे होते. त्यांनी जोगराजिंग आणि त्याच्या साथीदारांवर हल्ला केला. त्यामुळे ते पाटणकर चौकाकडे पळून गेले. मात्र, लिटील आणि त्याच्या साथीदारांनी आपल्या ऑडी कारमधून त्यांचा पाठलाग केला व ग्रामीण पोलीस मुख्यालयासमोर त्यांच्यावर दहा ते बारा गोळ्या झाडल्या. मात्र, जोगराजसिंग आणि इतर त्यातून बचावले. मात्र, गोळीबाराच्या आवाजाने सर्व परिसर दणाणून गेले आणि जोगराजसिंगच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला. या प्रकरणात पोलिसांनी लिटील आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली. या प्रकरणाची सुनावणी विशेष मोक्का न्यायाधीश सलमान आझमी यांच्यासमक्ष झाली.

सरकारतर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी आरोपींची निर्दोष सुटका केली. आरोपींतर्फे अ‍ॅड. आर.के. तिवारी यांनी बाजू मांडली. तर सरकारतर्फे विशेष सरकारी वकील विजय कोल्हे यांनी काम पाहिले.