नागपूर जिल्ह्य़ातील गेल्या तीन महिन्यांची स्थिती

नागपूर : जिल्ह्य़ात आता करोनाच्या नवीन बाधितांसह करोनामुळे मृत्यू कमी होत आहे. परंतु गेल्या तीन महिन्यांची तुलना केल्यास जिल्ह्य़ातील सर्वाधिक ३.७६ टक्के मृत्यूदर ऑगस्ट महिन्यात नोंदवले गेले, तर १ ते १७ ऑक्टोबरदरम्यान ३.३७ टक्के मृत्यूचे प्रमाण राहिल्याने ते कमी करण्यासाठी आणखी प्रशासनाला परिश्रम घ्यावे लागणार आहे.

नागपुरातील जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार येथे १७ ऑक्टोबपर्यंत शहरी भागात ७० हजार ४५४, ग्रामीणला १९ हजार ३१५, जिल्ह्य़ाबाहेरील ५३२ असे एकूण ९० हजार ३०१ करोना बाधितांची नोंद झाली आहे. तर या दिवसापर्यंत शहरात २ हजार ५६, ग्रामीणला ५१९, जिल्ह्य़ाबाहेरील ३५० असे एकूण २ हजार ९२५ मृत्यू झाले. दरम्यान १ ते १७ ऑक्टोबर या सतरा दिवसांत शहरी भागात ८ हजार ४८८, ग्रामीणला ३ हजार ६९६, जिल्ह्य़ाबाहेरील १०५ अशा एकूण १२ हजार २८९ बाधित आढळले असून शहरात २३१, ग्रामीणला ७९, जिल्ह्य़ाबाहेरील १०५ असे एकूण ४१५ मृत्यू झालेत.

जिल्ह्य़ात आढळलेल्या एकूण बाधितांच्या तुलनेत मृत्यूचा दर ३.३७ टक्के होता. त्यातील फक्त शहर हद्दीतील रहिवाशांचे मृत्यूचे प्रमाण २.७२ टक्के, ग्रामीणमध्ये २.१३ टक्के होते. १ ते ३० सप्टेंबर दरम्यान शहरात ३९ हजार १०८, ग्रामीणला ९ हजार २०२, जिल्ह्य़ाबाहेरील १४७ असे एकूण ४८ हजार ४५७ नवीन बाधित आढळले. तर या कालावधीत शहरात १ हजार ३१, ग्रामीण २८७, जिल्ह्य़ाबाहेरील १४७ (पान ६ वर)

करोनामुक्त होणारेही अधिक

ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जिल्ह्य़ात सर्वत्र बाधितांची संख्या वाढली असली तरी करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. १  ते ३१ ऑगस्ट दरम्यान शहरात १२ हजार ६२८, ग्रामीणला ३ हजार १४० असे एकूण १५ हजार ७६८ व्यक्ती करोनामुक्त झाले. १ ते ३० सप्टेंबर दरम्यान शहरात ३५ हजार ६८६ तर ग्रामीणला ७ हजार ५३७ असे एकूण ४३ हजार २२३ व्यक्ती करोनामुक्त झाले. तर १ ते १७ ऑक्टोबरदरम्यान शहरात १३ हजार ६५९, ग्रामीणला ४ हजार ५१७ असे एकूण १८ हजार १७६ व्यक्ती करोनामुक्त झाले.