News Flash

लस पुरवठ्याबाबत राज्य सरकारकडून दुजाभाव

शहरात गेल्या काही दिवसांपासून लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

महापौर तिवारींची मुख्यमंत्र्यांवर टीका

नागपूर : राज्य सरकारकडून लसींचा पुरवठा होत नसल्याने शहरात गेल्या काही दिवसात लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. केंद्राकडून मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होत असताना त्याचे राज्य सरकारकडूनच समसमान वाटप होत नाही. एखाद्या नेत्यासोबत तुमचे मतभेद असतील, त्यासाठी नागपूरकरांना का वेठीस धरत आहात. मुख्यमंत्र्यांसाठी केवळ मुंबई महत्त्वाची आहे का, असा सवाल करत महापौर दयाशंकर तिवारी यांनी लस वाटपावरून राज्य सरकारवर आरोप केले.

शहरात गेल्या काही दिवसांपासून लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याला जबाबदार राज्य सरकार आहे. केंद्राकडे बोट दाखवून लसीचा पुरवठा होत नसल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. मात्र प्रत्यक्षात केंद्राकडून मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होत असून राज्य सरकार उपराजधानीत जास्त लस पोहोचू नये यासाठी प्रयत्न करत आहे. त्यांच्यासाठी केवळ मुंबई म्हत्त्वाची आहे. त्यांचे आमच्या नेत्यांसोबत वाद असतील पण त्यासाठी नागपूकरांना राज्य सरकार वेठीस धरत आहे.

राज्य सरकारमधील मंत्रीही याबाबत काहीच बोलत नाहीत. काँग्रेसच्या नेत्यांनी व नगरसेवकांनी आरोप करण्यापेक्षा जास्तीत जास्त लशी नागपुरात कशा आणता येतील त्यासाठी प्रयत्न करावेत. शहरातील विविध भागात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र लस उपलब्ध नसेल तर ४४ वर्षांवरील नागरिकांना लस कुठून देणार. लस खरेदीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. आम्ही लस खरेदीसाठी तयार आहोत. मात्र राज्य सरकार त्यास मंजुरी देत नाही. नागपूर आणि विदर्भात लस उपलब्ध होऊ नये असे प्रयत्न महाविकास आघाडीकडून सुरू असल्याचा आरोप तिवारी यांनी यावेळी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2021 12:05 am

Web Title: damage from state government regarding vaccine supply akp 94
Next Stories
1 बनावट सातबारा; तक्रारदाराचे घूमजाव
2 लस खरेदीसाठी निधी गोळा करण्यास विभागीय आयुक्तांचा ‘नकार’
3 रेल्वे प्रवाशाचा गुदमरून मृत्यू?
Just Now!
X