दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी चौकशी समितीवर दबाव?

नागपूर : वनखात्याने दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात नेमलेल्या चौकशी समितीच्या तिनही उपसमित्यांचा अहवाल १६ एप्रिलला आयोजित बैठकीत मांडण्यात येणार होता. मात्र, समितीची ही बैठकच रद्द करण्यात आल्याने या समितीवर कु णाचा दबाव तर नाही ना, अशी शंका व्यक्त के ली जात आहे.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) यांनी नेमलेल्या चौकशी समितीच्या तीन उपसमित्या गठीत करण्यात आल्या. प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.के . राव यांच्या अध्यक्षतेखालील विभागीय वनाधिकारी पीयूषा जगताप, वनपरिक्षेत्र अधिकारी कोकाटे, दुसऱ्या उपसमितीत मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण, वनविकास महामंडळाच्या मुख्य महाव्यवस्थापक मीरा त्रिवेदी, सेवानिवृत्त विभागीय वनाधिकारी किशोर मिश्रीकोटकर आणि तिसऱ्या उपसमितीत इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या समित्यांच्या गठनापासूनच  शंका व्यक्त करण्यात येत होती. यातील एक समितीने परतवाड्यातूनच चौकशीचे बस्तान गुंडाळण्याचा प्रयत्ना के ला होता. मात्र, ह्यलोकसत्ताह्णने वृत्त प्रकाशित करताच ही समिती चौकशीसाठी चिखलदरा आणि हरिसाल येथे पोहोचली. या समितीसमोर निलंबित उपवनसंरक्षक शिवकु मार यांच्या छळाच्या आणि तत्कालीन क्षेत्र संचालक व अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्याही दबावाच्या, वादग्रस्त निर्णयाच्या कथा समोर आल्या होत्या. या पहिल्या दौऱ्यात समितीने गोळा के लेल्या माहितीचा अहवाल १६ एप्रिलच्या बैठकीत मांडण्यात येणार होता. मात्र, या बैठकीलाच बगल देण्यात आल्याने या समितीवर दबाव असल्याची चर्चा खरी असल्याचे स्पष्ट होत आहे. ही आता बैठक होणार की नाही, होणार तर नेमकी कधी, याचेही संदेश सदस्यांपर्यंत पोहोचले नाहीत.

लवकरच बैठक

समितीतील काही सदस्य इतर बैठकांमध्ये व्यस्त असल्यामुळे समितीची बैठक होऊ शकली नाही. पण लवकरच ही बैठक होणार आहे. चौकशी हा समितीचा पहिला भाग असून त्यानंतर या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून समिती काही शिफारशी सादर करेल. -एम.के . राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (माहिती व तंत्रज्ञान)