20 January 2018

News Flash

विदर्भवाद्यांकडून गडकरींच्या राजीनाम्याची मागणी 

 शहीद चौकातील चंडिका मंदिरापासून विदर्भवाद्यांच्या मोर्चाला सुरुवात झाली.

प्रतिनिधी, नागपूर | Updated: August 10, 2017 1:55 AM

शहीद चौकातून निघालेला मोर्चा नितीन गडकरी यांच्या महाल येथील निवासस्थावर जाण्यापूर्वीच गांधी पुतळ्याजवळ त्याला अडविण्यात आले.  (लोकसत्ता छायाचित्र)

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचा विसर, टिळक पुतळ्याजवळ ठिय्या

स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन पाळले नाही म्हणून भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने काढलेला मोर्चा गडकरी यांच्या महाल येथील घराजवळ अडविण्यात आला.

शहीद चौकातील चंडिका मंदिरापासून विदर्भवाद्यांच्या मोर्चाला सुरुवात झाली. तेथून तो गडकरी यांच्या निवासस्थानी (वाडय़ावर) जाणार होता. मोर्चात १० ते १२ हजार शेतकरी आणि विदर्भवादी सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात १ हजार कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चा गांधी पुतळ्याजवळ अडविण्यात आला. काही युवकांनी कठडे ओलांडून समोर जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना अडविल्याने आंदोलकांनी त्याच ठिकाणी ठिय्या दिला. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारचा आणि भाजपच्या नेत्यांचा निषेध करण्यात आला. विदर्भाला विरोध करणाऱ्या गडकरी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी विदर्भ आंदोलनाचे नेते माजी आमदार वामनराव चटप, मुख्य निमंत्रक राम नेवले, प्रबीर कुमार चक्रवर्ती, श्रीनिवास खांदेवाले, धनंजय धार्मिक, अरुण केदार, अण्णाजी राजेधर, अ‍ॅड. नंदा पराते, संदेश सिंगलकर आदी विदर्भवादी नेते यावेळी उपस्थित होते.

गडकरी जनप्रतिनिधी नाही

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोक सभा निवडणुकीच्यावेळी सत्तेत आल्यावर विदर्भ देऊ, असे आश्वासन दिले होते. आता मात्र ते या विषयावर बोलत नाहीत. गेल्यावर्षी त्यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी नागपुरात नव्हते. त्यामुळे आज त्यांचा राजीनामा घेण्यासाठी निवासस्थानी येऊ म्हणून त्यांना पत्र देण्यात आले होते. मात्र, ते अनुपस्थित राहिल्याने ते जनप्रतिनिधी नाही हे सिद्ध झाले. पोलिसांनी दडपशाही पद्धतीने मोर्चा गांधी पुतळ्याजवळ अडविला. यापुढे विदर्भातील सर्वच खासदारांच्या निवासस्थानासमोर टप्याटप्याने आंदोलन केले जाणार असून आता रस्त्यावर येऊन विदर्भासाठी संघर्ष करू. १७ सप्टेंबरला अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करीत त्यांचा राजीनामा मागितला जाणार आहे.

वामनराव चटप, माजी आमदार

First Published on August 10, 2017 1:55 am

Web Title: demand for nitin gadkari resignation by vidarbha wadi
  1. P
    prafulla
    Aug 11, 2017 at 1:38 pm
    all vidhabvadis are useless, all depend on gadkari phadanvis ,they just barks.
    Reply