News Flash

तोतया पत्रकाराकडून जाहिरात मागण्याचा प्रकार

वीज यांनी जाहिरात देण्यास नकार दिला असता तो धमकावू लागला.

कळमना पोलीस ठाण्यात पेट्रोल पंप मालकाची तक्रार

‘विदर्भ लोकसत्ता’ या नावाने स्वत:ला पत्रकार सांगणाऱ्या तोतया पत्रकार खान नावाच्या व्यक्तीने अनेक पेट्रोल पंप मालकांकडून जाहिरात मागितली. जाहिरात देण्यास नकार दिल्यानंतर त्याने धमकी दिली. या प्रकरणात कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत असून रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर फॉर इंडियाच्या (आरएनआय) संकेतस्थळावर चौकशी केली असता ‘विदर्भ लोकसत्ता’ नावाने कोणत्याही वृत्तपत्राची नोंद नसल्याचे स्पष्ट झाले.

७ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजेच्या सुमारास एमएच-३०, एक्यू-७८८० क्रमांकाच्या दुचाकीने ३० ते ३५ वयोगटातील एक व्यक्ती पारडी नाका परिसरात पाल ऑटोमोबाईल्स पेट्रोल पंपावर पोहोचला. त्यावेळी त्याने मालक गजेंदरपालसिंग वीज (३८) रा गुरुनानकपुरा, अशोक चौक यांच्यासोबत भ्रमणध्वनीवरून संपर्क करून स्वत:ला ‘विदर्भ लोकसत्ता’ नावाच्या वृत्तपत्रामधून आल्याचे सांगून जाहिरात मागितली. वीज यांनी जाहिरात देण्यास नकार दिला असता तो धमकावू लागला. वीज यांनी पेट्रोल पंपावर थांबण्याची विनंती केली असता तो पळून गेला. या प्रकरणात वीज यांनी कळमना पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्याचा भ्रमणध्वनी क्रमांक व गाडीवरून तो एम. खान पाटील असल्याचे माहिती समोर आली.

त्याने विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष हरविंदरसिंग भाटीया, भंडारा मार्गावरील रवींद्र ऑटोमोबाईल्स यांच्याकडेही जाऊन जाहिरात मागण्याचा प्रयत्न केल्याची वीज यांनी माहिती दिली. कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ  निरीक्षक महेश चाटे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी अशा तोतया पत्रकारावर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2017 2:18 am

Web Title: demanding advertisement by fake journalist in nagpur
Next Stories
1 कर्करोगग्रस्त मुलांना मदतीचा हात
2 सरकारचे कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष
3 उपराष्ट्रपतींनी ‘प्रोटोकॉल’ मोडला
Just Now!
X