मागणीप्रमाणे रक्कम न दिल्याने ग्राहकांचा बँक कर्मचाऱ्यांवर रोष

चाकरमान्यांसाठी एक तारीख महत्त्वाची असते, कारण महिनाभरात घाम गाळल्यानंतर याच तारखेला पगार हातात पडतो, पण आजचा दिवस वेगळाचा होता. वेतनाचे पैसे बँक खात्यात असूनही बँका मोठय़ा रकमा देत नव्हत्या. यामुळे आमचा पैसा आम्हालाच मिळत नसल्याची भावना अनेकजण व्यक्त करीत होते.

आठ नोव्हेंबरला नोटाबंदी करण्याच्या निर्णयानंतर गुरुवारी एक तारखेला सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार बँकेत जमा झाले. मात्र, अनेक दिवसांपासून पशासाठी मनस्ताप सहन करणाऱ्या नागरिकांची पगार काढतांनाही निराशा झाली. नोटाबंदीच्या पूर्वी भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेकडून बँकांना मागणीप्रमाणे मिळणारे पसे आता मर्यादित मिळत असल्याने नोकरदारांचे खिसे रिकामेच राहिले. परिणामी ग्राहकांनी बँक कर्मचाऱ्यांवर आपला रोष व्यक्त केला.

दरम्यान, वास्तविक पगाराच्या दिवशी बँकांना भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेकडून मोठी रक्कम मिळणे अपेक्षित होते. मात्र, असे न झाल्याने ग्राहकांना त्यांच्या मागणी प्रमाणे बँकेतून पसा काढता आला नाही. रिझव्‍‌र्ह बँकेकडून अल्प पशांचा पुरवठा होत असल्याने बँकांनी ग्राहकांना मर्यादित पसा वितरित केला. एकीकडे एटीएममधून केवळ २ हजारांची एकच नोट निघत असल्याने पगाराच्या दिवशी अनेकांनी बँकेतून पगार काढण्यात भर दिला. मेडिकल चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये वेतन काढण्यासाठी आलेल्या नागरिकांनी रांगेत लागून वेतन काढावे लागत असल्याने नाराजी व्यक्त केली.

रिझव्‍‌र्ह बँकेकडून नोटांचा अपुरा पुरवठा 

पगाराच्या दिवशी बँक ऑफ त्रावणकोर येथील मुख्य शाखेला रिझव्‍‌र्ह बँकेकडून केवळ सहा लाख रुपये देण्यात आले. अशात मनीषनगर व काँग्रेसनगर शाखा मिळून ही रक्कम फारच कमी असल्याने बँकेत आलेल्या नागरिकांना मागणी प्रमाणे पसा मिळाला नाही. नोटाबंदीच्या पूर्वी याच शाखेला दिवसाला २ ते ४ कोटी रुपये प्रति दिन मिळत होते. मात्र, आता केवळ सहा लाख मिळत असल्याने पसा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाही, असे बँकेतील कर्मचाऱ्याने सांगितले.

नोटांचा मागणीप्रमाणे पुरवठा नाही

बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेला त्यांच्या पूर्ण शाखा मिळून बऱ्यापकी पसा मिळाला आहे. मागणीप्रमाणे पुरवठा नाही. नोटाबंदी पूर्वी बँकेला मुबलक रक्कम मिळत असल्याने पसा बाजारात खेळत राहायचा अन् रिझव्‍‌र्ह बँकेकडून रोख मागण्याची वेळ कमी राहायची, मात्र आता चित्र उलटे आहे.

तडजोडीची लाचारी

बाजारात मुबलक पैसा मिळत नसल्याने काटकरीने खर्च करावे लागत आहे. अडीच हजार रुपये काढायचे आणि दैनंदिन गरजा, घर खर्च भागवण्याचा प्रयत्न असतो. काही व्यवहार धनादेशाद्वारे केले जात आहेत. मोठी रक्कम हवी असल्यास बँकेसमोर रांगेत उभे राहण्याशिवाय पर्याय नाही. नोकरीला लागल्यापासून पगाराच्या दिवशी अशी अवस्था पहिल्यांदाच झाली आहे. वेतनाच्या दिवशी रांगेत उभे राहून पैसे काढण्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

अतुल नांदुरकर, तुकडोजी पुतळा परिसर

दैनंदिन गरजा भावण्यासाठी रांगेत

जीवन विमा आणि इतर कर्जाचे हप्ते बँक खात्यातून कपात होतात. मुख्य खर्च जसे भाजीपाला, किराणा, दूध, ब्रेड, ऑटोरिक्षा आदींसाठी रोख रकमेची आवश्यकता आहे. बँकेतून एकाचवेळी मोठी रक्कम मिळत नाही. त्यामुळे खर्च करण्यासाठी वारंवार बँकेत यावे लागते. आज वेतन जमा झाले. त्यामुळे पैसे काढण्यासाठी आलो. सरकारने हा तिढा सोडवण्यासाठी लवरात लवकर पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा उपलब्ध कराव्यात.

तुषार भगत, तकियाधंतोली.