भारताने ९ हजार किलो व्हॅट क्षमता असलेले आणि १२० किलोमीटर प्रतितास धावू शकणारे ‘व्हॅग-१२’ हे अत्याधुनिक रेल्वे इंजिन तयार केले असून त्यासाठी नागपुरात आगार तयार केले जाणार आहे.

फ्रान्स आणि भारतीय रेल्वे यांनी २०१५ पासून बिहारमधील मधेपुरा येथे ८०० इलेक्ट्रिक रेल्वे इंजिन (व्हॅग-१२) तयार केले जात आहे. त्यातील पहिले इंजिन आज बुधवारी नागपूर येथून मालगाडी घेऊन रवाना झाले. हे इंजिन १२०० एचपी (९ हजार किलो व्हॅट) क्षमतेचे आहे. नागपुरात २५० इंजिनची देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. त्यासाठी अजनी येथे २०२२ पर्यंत देखभाल दुरुस्ती केंद्र उभारण्यात येणार आहे. हे इंजिन मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत तयार केले जात आहेत. बिहारच्या मधेपुरा इलेक्ट्रिक लोको फॅक्टरीने देशातील पहिले स्वदेशी १२००० एचपी क्षमतेचा रेल्वे इंजिन तयार केले आहे. एवढय़ा क्षमतेचे रेल्वे इंजिन तयार करणार भारत देशातील सहावा देश आहे. हे इंजिन सध्या १०० किलोमीटर प्रतितास आणि भविष्यात १२० किलोमीटर प्रतितास वेगाने धावू शकणार आहे.

नागपुरात नवीन इंजिन धावले

या अत्याधुनिक इंजिनद्वारे बुधवारी आमला ते नागपूर अशी मालगाडी सोडण्यात आली. हे इंजिनचा जीपीएसद्वारे मागोवा घेतला जाऊ शकतो.