मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

विरोधीपक्ष विविध अफवा फसरवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे, विरोधकांच्या राजकीय अफवांना वस्तुस्थितीच्या उत्तराने देण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला येथील रामगिरी निवासस्थानी आयोजित चहापान कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पावसाळी अधिवेशन असल्याने खरीप हंगाम आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भर असेल. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी या अधिवेशनात निर्णय घेतले जातील. अधिवेशन काळात जनहिताच्या विविध २७ विधेयकांवर चर्चा होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. कोयना प्रकल्पग्रस्तांच्या नवी मुंबई येथील जमिनीसंदर्भात विरोधी पक्षांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. विरोधी पक्षांमार्फत अशा पद्धतीने विनाकारण अफवा पसरविण्यात आल्यास त्याला वसस्तुस्थितीने उत्तर दिले जाईल. २८ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. मागील खरीप हंगामात कापसावर बोंडअळीचा प्रश्न निर्माण झाला होता. या बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना विम्याच्या भरपाई पोटी २३३७ कोटी रुपये द्यावयाचे होते. त्यापैकी आतापर्यंत २१०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. उर्वरीत रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू आहे. बोंडअळी नुकसानीची १८ लाख १६ हजार ५५७ शेतकऱ्यांना थेट मदत देण्यात आली आहे. याशिवाय नुकतीच ३०० कोटी रुपयांची मागणी आली आहे. आतापर्यंत २५ टक्क्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना पीककर्ज दिले आहे. मागील सरकारच्या काळात दरवर्षी सरासरी १७ ते १८ हजार कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप होत होते. आमच्या सरकारच्या काळात पहिल्या वर्षी ४० हजार कोटी, दुसऱ्या वर्षी ४६ हजार कोटी तर तिसऱ्या वर्षी २५ हजार कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. ४६  लाख खाती पूर्ण झाली असून ३८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये कर्जमाफीचे पैसै जमा झाले आहेत, असे त्यांनी सांगितले. धुळ्याच्या घटनेनंतर अफवांचे पेव सुरू आहे. त्याविरुद्ध पोलिसांनी मोहीम उघडली आहे. धुळे घटनेतील आरोपींविरुद्धचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल, याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.