News Flash

अनेक आमदारांना मधुमेह आणि रक्तदाब!

जीवनशैलीत बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

आमदारांकरिता विधिमंडळ परिसरात आयोजित तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

३६ लोकप्रतिनिधींच्या आरोग्य तपासणीत निदान;जीवनशैलीत बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

लोकांचे जीवनमान व आरोग्याबाबत विधिमंडळात आवाज उठविणाऱ्या बऱ्याच सदस्यांनाच रक्तदाब आणि मधुमेहाने ग्रासले आहे. बुधवारी विधिमंडळ परिसरातील लठ्ठपणा तपासणी शिबिरात ३६ आमदारांसह ५ मंत्र्यांपैकी २५ टक्क्यांहून जास्तजणांत उच्च रक्तदाब वा मधुमेह आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली. लोकप्रतिनिधींनाही आपले आरोग्य सांभाळण्याची गरज असल्याचे निदर्शनास आले.

लठ्ठपणा जनजागृतीसाठी पुढाकार घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचा वैद्यकीय शिक्षण विभागाचा दावा आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आमदारांसह कर्मचारी, प्रसिद्धीमाध्यमांचे प्रतिनिधी, सुरक्षा यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचा लठ्ठपणा आरोग्य तपासणी बुधवारी वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि मुंबईच्या जेटी फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली. दोन दिवस चालणाऱ्या शिबिराच्या पहिल्या दिवशी सगळ्याच गटातील ३५० हून जास्त जणांनी तपासणी झाली.

राजकीय जीवन तणावाचे- मुख्यमंत्री

राजकीय क्षेत्रात काम करताना लोकप्रतिनिधींना अनेक ताण- तणावाला तोंड द्यावे लागते. त्यामुळे त्यांनी आपल्या जीवनशैलीत बदल करून निरोगी राहण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांनी दिला. आमदारांच्या लठ्ठपणा तपासणी शिबिराचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. लठ्ठपणा टाळण्याची माहिती नागरिकांपर्यंत  पोहचावी म्हणून शासन लवकरच शाळा, महाविद्यालयातही ही चळवळ राबवेल, असेही ते म्हणाले.

राजकीय वजन वाढवण्याकरिता शारीरिक वजन कमी करा-महाजन

पूर्वी श्रीमंतांचा आजार म्हणून लठ्ठपणाकडे बघितले जात होते. परंतु आता सगळ्याच गटातील नागरिकांत हा आजार दिसतो. त्यावर नियंत्रणाकरिता वैद्यकीय शिक्षण विभागाकडून राज्यातील १६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लठ्ठपणाकरिता स्वतंत्र उपचार बाह्य़रुग्ण विभागात सुरू होणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधी हे दिवसरात्र सर्वसामान्यांच्या प्रश्नांकरिता झटत असल्याने त्यांच्यातही लठ्ठपणा वाढत आहे. तेव्हा त्यांचे राजकीय वजन वाढवण्याकरिता त्यांनी शारीरिक वजन कमी करावे, असे मत वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2016 1:24 am

Web Title: devendra fadnavis diabetes blood pressure
Next Stories
1 लोकजागर : माणुसकीच्या भिंतींना तडे नको
2 मुन्ना यादवांना पाठीशी का घालता?
3 विधानभवन परिसरात सुटय़ांकरिता पायपीट
Just Now!
X