News Flash

अनावर शोक अन् कुटुंबीयांचा टाहो

आज सकाळी प्रत्येकाच्या घरासमोर आणि वस्तीमध्ये शोकाकुल वातावरण होते

drowned incident in Vena river
डोईफोडे आणि जाधव कुटुंबीयांच्या घरासमोर पार्थिवाची प्रतीक्षा करताना कुटुंबातील सदस्य..

रविवार सुटीचा दिवस, त्यामुळे दुपापर्यंत घरीच आराम करून दुपारी मित्राच्या वाढदिवसाला जातो असे सांगून निघालेल्या नागपुरातील पाच तरुणांच्या घरी सोमवारी शोकाकुल वातावरण होते. मुलांच्या पार्थिवाची प्रतीक्षा करताना कटुंबीयातील सदस्यांना सोमवारी दुपापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. माझ्या मुलाला, माझ्या दादाला लवकर घरी आणा हो.. एकदा तरी त्याला बघू द्या हो.. असा हंबरडा फोडत कोणाची आई, कोणाचे वडील तर कोणाची बहीण पार्थिव केव्हा येईल याची वाट पहात खिन्न बसले होते.

उदयनगरमधील पंकज डोईफोडे, हुडकेश्वर भागातील गुरुकृपा नगरातील अतुल भोयर, अंबिका नगरातील प्रतीक आमडे, सुभेदार लेआऊट परिसरातील राहुल जाधव आणि शास्त्रीनगर येथील परेश कोटाके, रोशन आणि अमोल दोडके हे सर्व मित्र रविवारी दुपारी मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी म्हणून एकत्र कारने निघाल्यावर रात्री आठ ते नऊच्या सुमारास प्रत्येकाच्या घरचे फोन खणखणले आणि प्रत्येकाचे कुटुंब सुन्न झाले.

आज सकाळी प्रत्येकाच्या घरासमोर आणि वस्तीमध्ये शोकाकुल वातावरण होते. सापडला का हो मुलगा म्हणून परिसरातील लोक विचारपूस करीत होते. अतुल जाधवचे पार्थिव आज सकाळी नागपुरात आले आणि शोकाकुल वातावरणात माानेवाडा घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. मात्र, इतरांचे मृतदेह सापडण्यास विलंब झाला. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय मुलांच्या पार्थिवाच्या प्रतीक्षेत होते. उदयनगरातील पंकज डोईफोडेच्या घरासमोरून अतुल जाधवची अंत्ययात्रा गेली त्यावेळी त्यांच्या डोफेफोडे कुटुंबातील सदस्य आमचा पंकज केव्हा येईल म्हणून ओक्साबोक्शी रडत होते. राहुल भोयरचे वडील आणि आई काही न बोलता बसले होते, तर पत्नी खिन्न मनाने दीड वर्षांची मुलगी घेऊन एका कोपऱ्यात बसली होती. मुलगी तिच्याजवळ खेळत होती. तिला वडील गेल्याचे कळलेही नव्हते.

परेशची आई बेशुद्ध

दोन तासात येतो असे सांगून गेलेल्या रमानगरातील परेश कोटाकेच्या घरचीही अवस्था अशीच होती. त्याचे पार्थिव मिळाल्याचे कळताच त्यांच्या आईने हंबरडा फोडला आणि बेशुद्ध झाली. घरातील वातावणही सुन्न होऊन गेले होते. शेजारी राहणाऱ्यांनी डॉक्टरला घरी बोलावले आणि आईला औषध देऊन परिवारातील सदस्यांनी त्यांना शांत केले.

‘माझा भाऊ केव्हा येईल’

प्रतीक आमडेची आई आणि छोटी बहीण प्रतीक्षेत घरी बसले होते. माझा भाऊ मोठा असला तरी माझ्यासाठी वडिलासारखा होता, त्यामुळे त्यांच्याशिवाय मी राहू शकत नाही, असे सांगत तिने हंबरडा फोडला आणि वातावरण भाऊक झाले. दुपारी त्याचे पार्थिव मिळाल्याचे कळताच प्रतीकची बहीण दाराजवळ येऊन माझा भाऊ केव्हा येईल हो म्हणून विचारणा करीत होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2017 3:15 am

Web Title: distressful atmosphere in nagpur due to drowned incident in vena river
Next Stories
1 मी कुणालाच वाचवू शकलो नाही
2 संतप्त नागरिक, हतबल प्रशासन
3 स्मार्ट सिटीचा बाजार रस्त्यावर
Just Now!
X