‘संघर्ष जगण्याचा’ प्रकल्पाचा उपक्रम

नागपूर : श्री गजानन शिक्षण सेवा संस्था द्वारा संचालित ‘संघर्ष जगण्याचा’ या प्रकल्पाद्वारे करोनामुळे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना सोयाबीन, धान व कपाशी बियाण्यांचे वाटप करण्यात आले. तर इतर आजारामुळे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या परिवाराला धान्यसंचाचे वाटप करण्यात आले.

यावेळी पशुसंवर्धन, दुग्ध विकास मंत्री सुनील के दार, जि.प.अध्यक्ष बर्वे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुरेश भोयर, कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई आणि कामठीचे सभापती हुकू मचंद आमधरे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सर्व करोनामुळे मृत्यू  झालेल्यांना श्रद्धांजली समर्पित करून करण्यात आली. प्राध्यापिका अवंतिका लेकु रवाळे प्रस्ताविक करताना म्हणाल्या, समाजाप्रती आपली बांधीलकी स्वीकारून करोनाच्या पहिला लाटेत राज्यांतर्गत स्थलांतरित प्रवाशांना २४ तास जेवणाची व वैद्यकीय सोय महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत प्रवासाची सोय करून दिली. गरजूंना साडेचार हजार धान्यसंच वाटप केले. दुसऱ्या लाटेत बडोदा सर्कलच्या बाधितांना प्राणवायू सिलिंडर उपलब्ध करून दिले.  समाजाला गरज असेल तेव्हा सदैव समाजबांधवांच्या मदतीसाठी तत्पर असेल.

सुरेश भोयर यांनी अशाच प्रकारे मदत वाटपाचे कार्यक्रम आम्ही इतरही ठिकाणी घेऊ  आणि जनतेच्या हक्कासाठी सतत त्यांच्या सोबत उभे राहू असा निर्धार व्यक्त केला. सुनील केदार यांनी शिक्षण सेवा संस्थेच्या अध्यक्ष अवंतिका लेकु रवाळे यांनी अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबवला असून हा उपक्रम जिल्ह्य़ात सर्वत्र राबवण्यात येईल अशी घोषणा के ली. तसेच या काळामध्ये जिल्हा परिषद शासन आणि प्रशासन सर्व जिल्हा परिषद सदस्य यांच्यामार्फत अतिशय चांगले काम करण्यात आले.