झोपडपट्टीतील मुलांना दिवाळीला फराळाचे वाटप

बेधुंद तरुणाई असा अनेकदा उल्लेख होता. अनेकदा बेपर्वा, बेधुंद आणि अनियंत्रित तरुणाईचे रूपच समाजासमोर अधिक येत असते. त्यामुळे कदाचित बेधुंद तरुणाई असाच लोकांचा समज झालेला आहे. मात्र, या तरुणाईला दुसरा एक चेहरा आहे. आजच्या तरुणाईला सामाजिक व आपल्या कर्तव्याची जाणीवही आहे. याचा प्रत्यय ‘पसायदान’ या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यातून येतो. या संस्थेशी जुळलेल्या तरुणांनी घरांमध्ये फटाके न उडविता तेच पैसे गोळा करून दिवाळीनिमित्त शहरातील अनेक झोपडपट्टींमधील लहान मुलांमध्ये फराळ व मिठाईचे वाटप करून समाजासमोर एक आदर्श घालून दिला.

पसायदान या संस्थेशी २० ते ३५ वष्रे वयोगटातील ५० तरुण जुळलेले असून ते आज शिक्षक, बँक कर्मचारी, विविध खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आहेत. जवळपास दहा वर्षांपूर्वी नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली अशा जिल्ह्य़ातील तरुण एकत्र शिकायला होते. यातून त्यांची मैत्री झाली. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तरुण रोजगाराला लागले. त्यानंतर आपणही समाजाला काहीतरी देणे लागतो या भावनेतून तरुणांनी एकत्र येऊन रामदासपेठ येथील एका खासगी कंपनीच्या कार्यालयात आठ वर्षांपूर्वी ‘पसायदान’ संस्थेची स्थापना झाली. तेव्हापासून या संस्थेचे सामाजिक कार्य नियमित सुरू आहे.

विकास मरकडेय हे या संस्थेचे अध्यक्ष असून त्यांनी सांगितले की, संस्थेच्या सामाजिक कार्याची सुरुवातच ‘स्त्री भ्रूण हत्या’ विषयाच्या जनजागृतीपासून करण्यात आली. स्त्री भ्रूण हत्येविषयी प्रौढ व्यक्तिंमध्ये जनजागृतीसाठी एक वेगळा प्रयोग राबविण्यात आला. शहरांमधील अनेक शाळांमधील मुलांसह त्यांच्या पालकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून ‘लेक लाडकी’ हा उपक्रम राबविण्यात आला. त्यासाठी एक प्रष्टद्धr(२२४)्नाावली तयार करून वयोगटाप्रमाणे स्पर्धा घेण्यात आली. या स्पध्रेत शहरातील २ हजार ५०० वर विद्यार्थी, विद्यार्थिनींनी भाग घेतला होता. सर्वात उत्तम प्रष्टद्धr(२२४)्नाावली भरणाऱ्यांना विविध पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. त्या प्रष्टद्धr(२२४)्नाावलीत ‘स्त्री भ्रूण हत्या’ आणि समाजातील स्त्रीयांचं योगदान यासंदर्भात अनेक प्रष्टद्धr(२२४)्ना होती. त्यापैकी एक प्रष्टद्धr(२२४)्ना हा मुलांच्या पालकांना भरायचा होता. त्यावेळी अनेक मुलामुलींनी त्यांच्या घरातील भेदभावाविषयी माहिती लिहून दिली होती. शाळांचे प्राचार्य व मुलांच्या पालकांनी उपक्रमाची स्तूती केली. उपक्रमाला मिळालेले यश बघून संस्थेच्या सदस्यांमध्ये हुरुप निर्माण झाला आणि समाजकार्य करण्यासाठी प्रेरणा मिळाली. त्यानंतर संस्थेतर्फे विविध शाळांमध्ये जाऊन मुलांना कला व हातमाग कलेचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबविला. संस्थेतील जुडलेल्या तरुणांना इतरांकडून अनुभव मिळावेत याकरिता शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कारही संस्थेने केला. त्यातून निकोप व निश्वार्थपणे कार्य करण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली. संस्थेतील तरुण-तरुणींचे गट करून विविध अनाथआश्रमांमध्ये राहात असलेल्या मुलांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर सदस्यांनी आपल्या मासिक खर्चातून काही पैसे वाचवून अनाथआश्रम, प्लॅटफॉर्म शाळेतील मुलांना खेळणी, शैक्षणिक साहित्य, अन्नधान्य आदींचा पुरवठा केला. एक दिवस प्लॅटफॉर्म स्कूलमध्ये सर्व मुलांचा सामूहिक वाढदिवस साजरा केला. गणपती व दुर्गा उत्सवादरम्यान निर्माल्य गोळा करण्याचे काम संस्थेतर्फे करणे, असे उपक्रम संस्थेतर्फे राबविण्यात येतात.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संस्थेच्या सदस्यांनी फटाके न उडविण्याचा संकल्प केला. ते पैसे गोळा करून फराळ व मिठाई तयार केली आणि त्याचे विविध झोपडपट्टयांमधील गरीब व गरजू मुलांना वाटप केले. यात प्रामुख्याने कचरा वेचणारी मुले, भीक मागणाऱ्या मुलांचा समावेश आहे. फराळ व मिठाईचे वाटप करताना मुलांच्या चेहऱ्यावर फुललेले स्मीत हे अत्यानंद देऊन गेले. या संस्थेचे कार्य असेच सुरू राहील.

–  विकास मरकडेय, अध्यक्ष, ‘पसायदान’, नागपूर.