बचत गटाच्या आठ हजार महिलांना रोजगार

हल्ली नोकरदार कुटुंबात स्वयंपाकघरात बसून चकल्या, करंज्या तळण्यासाठी कुणालाच वेळ नसतो. त्यामुळे तयार फराळाची (पाकीटबंद) खरेदी वाढली आहे. यंदाच्या दिवाळीत या व्यवसायात नागपुरात सुमारे तीन ते पाच कोटींची उलाढाल झाली. या उद्योगाने उंच भरारी घेतल्याने फराळ तयार करणाऱ्या बचत गटातील महिलांनाही चांगले पैसे मिळाले आहेत.

Mata Mahakali Yatra in Chandrapur to Commence on 14 April
१४ एप्रिलपासून माता महाकालीच्या यात्रेला सुरूवात; एक महिना चालणार यात्रा, तयारी पूर्ण
Drain cleaning mumbai
नालेसफाईला सुरुवात, आतापर्यंत १५ टक्के गाळ काढला
ST Bank in trouble Suspension of loan provision to members
‘एसटी बँक’ अडचणीत! सभासदांच्या कर्ज पुरवठ्याला स्थगिती, कारण काय? वाचा…
virar bolinj mhada
दीड हजार कोटीची ५,१९४ घरे विक्रीविना, विरारबोळींजमधील घरांसाठी म्हाडाची कसरत सुरूच

यंदा बहुतांश घरी दिवाळीत रेडिमेड फराळाची चव चाखली गेली. पाकीटबंद फराळाच्या उद्योगात गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पट उलाढाल झाली. आता हा ट्रेन्ड  बाराही महिने दिसू लागला आहे.

नागपुरात सुमारे ७० ते ८० महिला बचतगट आहेत. यंदा दिवाळीच्या काळात तयार होणाऱ्या फराळाची मोठी मागणी बचत गटाकडे नोंदवण्यात आली.  लोकांनी पूर्वनोंदणी करून फराळांची पाकिटे विकत घेतली. यामध्ये चकल्या, अनारसे, बेसन लाडू, बेसन वडय़ा, विचडा, जाडे आणि पातळ शेव, बालुशाही, गोड आणि खारे शक्करपाळे, बुंदीचे लाडू, पिठाच्या आणि खोबऱ्याच्या करंज्यांचा समावेश होता. पूर्वी दिवाळीच्या आधीच घरोघरी दिवाळीच्या फराळाचे पदार्थ करण्याची धामधूम सुरू व्हायची.  मात्र बदलत्या काळात पती-पत्नी नोकरीला असणाऱ्या  कुटुंबांची संख्या सातत्याने वाढत गेली. परिणामी दिवाळीचा फराळ घरी बनवण्याची प्रथा हळूहळू मंदावली. ही बाब लक्षात घेऊन महिला बचत गटांनी यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक फराळ तयार केला होता. अगदी घरगुती चव आणि भेसळ नसल्याने नागपूरकरांनी या बचत गटांकडे फराळाची मोठी मागणी नोंदवली. सुमारे आठ हजार महिलांना यामुळे रोजगार मिळाला आहे.

नागपुरी फराळाचे विदेशातही आकर्षण

काही महिला बचत गटातून खेरदी करण्यात आलेला फराळ हा थेट अमेरिका, लंडन, ऑस्ट्रेलियासह देशभरातील अनेक ठिकाणी गेला.  हा फराळ विदेशात पाठवण्यात येणार असल्याने  आपल्या आवडीनुसार तयार करून घेण्यात आला. विदेशातील काहींनी भारतातून भाजणीच्या चकल्याही मागवल्याचे कळते.

नोकरी करून पारंपरिक फराळ तयार करणे आता जमत नाही. त्यामुळे महिला बचत गटाकडे ओघ वाढला असून तयार फराळाची मागणी दुप्पट झाली आहे. शुद्ध आणि भेसळमुक्त तयार फराळ मिळत असल्याने महिला बचत गटाकडे दिवाळीच्या तीन-चार दिवसांपूर्वीपासूनच मोठय़ा संख्येने पूर्व नोंदणी करण्यात आली होती. शहरातील जवळपास ७० छोटय़ा मोठय़ा महिला बचत गटांना दवाळीत चांगलाच रोजगार मिळाला. – मीना भागवाटकर, उत्कर्ष फाऊंडेशन महिला बचत गट.