संतप्त व्यावसायिकांचा सवाल; हॉटेल्सवरील निर्बंध कायमच

नागपूर : राज्य सरकारने  बाजारपेठांच्या वेळात वाढ करून रात्री आठपर्यंत व्यवसाय करण्यास शिथिलता दिली आहे. मात्र हॉटेलांवर निर्बंध कायम असून दुपारी चारनंतर हॉटेल बंद ठवण्याचे निर्देश कायम आहेत. त्यामुळे करोना काय हॉटेलातूनच पसरतो काय, असा संतप्त सवाल हॉटेल व्यवसायिकांनी केला आहे.

नागपुरात करोनाची स्थिती आटोक्यात असून करोनाच्या निर्धारित स्तरात नागपूर स्तर एक मध्ये मोडते. अशात येथे रात्री आठपर्यंत व्यवसाय करण्याची मुभा आहे. मात्र येथे तिसऱ्या स्तरातील निर्बंध लावण्यात आले असून दुकाने दुपारी चार वाजता बंद करावी लागत आहे. तसेच शनिवारी व रविवारी दुकाने बंद ठेवावी लागतात.

अशात व्यापाऱ्यांचा व्यवसाय होत नसल्यामुळे स्तर एकचे निर्बंध लावावे आणि बाजारपेठा रात्री आठपर्यंत सरू ठेवाव्यात, अशी मागणी व्यापारी संघटनांनी अनेकदा राज्य सरकारकडे केली आहे.

त्यावर सोमवारी राज्य सरकारने नवे अदेश जाहीर केले. त्यामध्ये  शहरातील सर्व बाजारपेठा अथवा दुकाने रात्री आठपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. परंतु हॉटेल चालकांवरील निर्बंध कायम आहेत. त्यामुळे हॉटेल व्यवसाय क्षेत्रात रोष कायम आहे. करोना का केवळ हॉटेलमधूच पसरतो काय, असा सवाल हॉटेल व्यवसायिकांनी केला आहे. नव्या शिथिलतेमुळे एकीकडे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला असून त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत. तर दुसरीकडे हॉटेल व्यवसायिकांवरील निर्बंध कायम असल्याने या व्यवसायिकांमध्ये नाराजी कायम असून रोष व्यक्त करण्यात येत आहे.

हॉटेल चालकांची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. त्यात सरकारने सर्व बाजारपेठांसाठी निर्बंध शिथिल केले असून आमच्यावर अन्याय केला आहे. करोना काय हॉटेलातून पसरतो काय? याचा कोणता अभ्यास अथवा सर्वेक्षण तुमच्याकडे आहे काय? तसे असेल तर आमचे हॉटेल कायमस्वरूपी बंद करा.  – र्तेंजदर्रंसग रेणू, अध्यक्ष नागपूर रेसिडेंशियल हॉटेल्स् असोसिएशन