चिमूर तालुक्यातील पिंपळगाव येथील रहिवासी आणि कामठीच्या एस.के. पोरवाल महाविद्यालयातील रसायनशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. रतीराम चौधरी यांचे २० ते २३ ऑगस्ट दरम्यान स्टॉकहोम (स्वीडन) येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत विविध देशातील तज्ज्ञ प्राध्यापक सहभागी होणार असून डॉ. चौधरी ‘ग्रीन अ‍ॅप्रोचेस फॉर फॅब्रिकेशन ऑफ  नॅनो मायक्रो स्ट्रक्चर्स इलेक्ट्रॉन स्पेक्ट्रोस्कोपी अ‍ॅण्ड अ‍ॅप्लिकेशन’या विषयावर विशेष व्याख्यान देणार आहेत. चौधरींनी पन्नासहून अधिक आंतरराष्ट्रीय संशोधन पेपरचे लेखन केले आहे. चौधरी हे पीएच.डी.चे मार्गदर्शक असून त्यांचे दोन पुस्तक प्रकाशित झाले आहेत. अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत.