डॉ. नितीन राऊत यांचा आरोप

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांच्या हक्काच्या ६.५ कोटी लसी पाकिस्तानसह विदेशात मोफत वाटल्या आणि देशातील लोकांना लसीसाठी रांगेत उभे के ले, अशी टीका राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत के ली.

मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारला सात वर्षे पूर्ण झाले. या सात वर्षांत देशात मोदींनी युवक, शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पाळले नाही. सरकारी कं पन्यांचे खासगीकरण के ले. बरोजगारी वाढवली, पेट्रोल -डिझेल, घरगुती गॅस सिलिंडरचे दर भरमसाठ वाढवले. अर्थव्यवस्था रसातळाला गेली. मोदी सरकारने लसीकरणाचे कोणतेही धोरण आखलेले नाही. सर्व अधिकार केंद्राकडे ठेवून जबाबदारी मात्र राज्य सरकारवर ढकलायची असे मोदी सरकारचे धोरण आहे. त्यांनी करोनाची स्थिती हाताळण्यात अक्षम्य चुका के ल्या. त्यामुळे औषध, प्राणवायू आणि अवस्थेमुळे लोकांचे जीव गेले, असा घणाघात राऊत यांनी के ला. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक, आमदार राजू पारवे, आमदार अ‍ॅड. अभिजित वंजारी, नाना गावंडे उपस्थित होते.

राऊत म्हणाले, मोदींनी वर्षांला दोन कोटी रोजगार देण्याचे आणि प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते.  शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, काळा पैसा भारतात आणणार आणि १०० दिवसात महागाई कमी करणार, असे बाता मारल्या होत्या. त्यापैकी काहीही झालेले नाही. उलट पेट्रोल १०० रुपये लिटर, डिझेल ९० रुपये, खाद्यतेल १८० ते २०० रुपये लिटर  झाल्याने लोकांचे जगणे अवघड  झाले आहे.

शेतीचे साहित्य, बी-बियाणे, खते, डिझेल महाग झाले. या सरकारने काळे कृषी कायदे आणून शेतकऱ्यांनाच उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले आहे. कामगार कायद्यात सुधारणेच्या नावाखाली कामगारांना भांडवलदारांचे गुलाम बनवले,असा आरोपांचा पाढाच राऊत यांनी वाचला.