21 September 2020

News Flash

चला, कुपोषणमुक्तीचा संकल्प करू!

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ ही संस्था बालमृत्यू आणि कुपोषणाबाबत गेल्या १७ वर्षांपासून काम करीत आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

नक्षलवाद्यांचे प्राबल्य असलेल्या क्षेत्रात राहून आदिवासींच्या उत्थानासाठी काम करणे हे आव्हान मोठेच. मात्र डॉ. सतीश गोगुलवार आणि शुभदा देशमुख या ध्येयवादी दाम्पत्याने गडचिरोलीत आदिवासींमध्ये आत्मभानाची ज्योत पेटविली आणि त्यांच्या सक्षमीकरणाचा मार्ग सुकर केला. आदिवासींच्या विविध समस्या सोडविण्यासाठी ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ ही संस्था स्थापन करणाऱ्या या दाम्पत्याचा कुपोषणाविरोधातील लढा शहरी भागापर्यंत पोहोचला आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी कुपोषणाची समस्या तीव्र झाली आहे. यामुळे कुपोषणाच्या समूळ उच्चाटनाची या दाम्पत्याची योजना असून त्यासाठी अर्थसाहाय्याची गरज आहे.

‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ ही संस्था बालमृत्यू आणि कुपोषणाबाबत गेल्या १७ वर्षांपासून काम करीत आहे. २००० सालापासून सुरू झालेले काम आता शहरापर्यंत येऊन पोहोचले आहे. नवजात बाळ आणि आईचे संगोपन कसे करायचे याचे प्रशिक्षण महिला बचत गटाच्या कार्यकर्त्यांना देण्यापासून त्यांनी सुरुवात केली. या महिलांनी ग्रामीण भागात सर्वेक्षण केल्यानंतर कुपोषणाचे भीषण वास्तव समोर आले. २००२ ते २००५ या काळात कोरची तालुक्यातील ३० गावांमध्ये बालमृत्यू दर ७२ वर असल्याचे आढळले. मात्र या संस्थेने प्रशिक्षित केलेल्या महिलांनी केलेल्या कामामुळे हा आकडा ३६ वर घसरला. मनुष्यबळाबरोबरच आर्थिक साहाय्य मिळाले असते तर बालमृत्यू आणखी कमी करता आले असते, असे डॉ. गोगुलवार सांगतात.

नागपूरसारख्या शहरात संस्थेने सर्वेक्षण केले तेव्हा परिस्थिती त्याहूनही अधिक गंभीर आढळून आली. २००७ ते २०१५ पर्यंत नागपुरातील अनेक गरीब वस्त्यांमध्ये बालमृत्यू दर ३७ वर आढळून आला. ग्रामीण आणि शहरी भाग अशी तुलना केली तर तो अधिक होता. या संस्थेने अपंगांनाही स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी उपक्रम आखले आहेत. काही वर्षांपासून नागपुरात ही संस्था अपंगांना प्रशिक्षण देते. आता त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्याचा संस्थेचा मानस आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2017 5:34 am

Web Title: ekla chalo re dr satish gogulwar shubhada deshmukh
Next Stories
1 पोलिसांच्या ई-तक्रार सुविधेला राज्यात अल्पप्रतिसाद
2 मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात कंबर मोडणारे खड्डे
3 आंतरराज्यीय परिषदेत गुन्हेगारांच्या माहितीचे आदानप्रदान
Just Now!
X