News Flash

सात लाख वीजग्राहकांकडे काळ्या यादीतील कंपनीचे मीटर

महावितरणला काही वर्षांपूर्वी ‘फ्लॅश’ आणि ‘रोलेक्स’ या दोन कंपन्यांकडून वीज मीटरचा पुरवठा झाला होता.

( संग्रहीत छायाचित्र )

विदर्भातील धक्कादायक स्थिती

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज्यातील वीज यंत्रणा सक्षम होत असल्याचा दावा करीत असले तरी विदर्भात चित्र वेगळे आहे. येथे सात लाख ग्राहकांकडे काळ्या यादीत टाकलेल्या कंपनीचे वीज मीटर लागले आहेत. हे मीटर वेगाने फिरत असल्याने ग्राहकांना अधिक देयके येत असल्याच्या तक्रारी आहेत.

महावितरणला काही वर्षांपूर्वी ‘फ्लॅश’ आणि ‘रोलेक्स’ या दोन कंपन्यांकडून वीज मीटरचा पुरवठा झाला होता. हे मीटर वेगाने फिरत असल्याच्या तक्रारी आल्यावर महावितरणने काही मीटरची तपासणी केली. यात ते दोषपूर्ण असल्याचे आढळून आले. त्यामुळे या कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले व त्यांच्याकडून मीटर खरेदी बंद करण्यात आली. या कंपन्यांनी लावलेले मीटर  बदलणे आवश्यक होते, परंतु विदर्भात सध्या सात लाख ग्राहकांकडे हे मीटर लागले आहे. यापैकी फार कमी मीटर सदोष असल्याचा दावा महावितरण करते.  वास्तविकतेत ग्राहकांना त्याने वापरलेल्या विजेपेक्षा जास्त विजेचे देयके पाठवू नये, असे महावितरणचे धोरण आहे. या पाश्र्वभूमीवर सात लाख मीटरचे काय? असा प्रश्न निर्माण होतो. काळ्या यादीतील कंपनीकडून पुरवठा झालेल्या मीटरपैकी ३१ मार्च २०१८ पर्यंत केवळ ४० हजार मीटर बदलले आहेत. उर्वरित मीटर बदलण्याचे आदेश महावितरणच्या मुख्यालयाने विविध कार्यालयाला दिले असले तरी प्रथम सर्वत्र जुने चक्रीवाले मीटर बदलवले जात आहेत. ग्राहकांच्या तक्रारी आल्यानंतरच काळ्या यादीतील कंपनीचे मीटर बदलवले जात आहेत. त्यामुळे तक्रार न करणाऱ्या, पण अधिक देयक येणाऱ्या ग्राहकांची यातून लूट होत आहे.

सर्वाधिक मीटर अकोला, नागपूर परिसरांत

विदर्भाच्या अकराही जिल्ह्य़ांत महावितरणच्या अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर या पाच झोन कार्यालयांच्या माध्यमातून वीजपुरवठा होतो. काळ्या यादीतील कंपनीकडून पुरवठा झालेले सर्वाधिक मीटर (दोन लाख) ३१ मार्च २०१८ ला अकोला झोनमध्ये लागले. त्यानंतर नागपूरचा क्रमांक असून येथे ही संख्या एक लाख ९९ हजार आहे, तर दोन्ही झोनमध्ये ३१ मार्चपर्यंत त्यातील १४ हजारांच्या जवळपास मीटर बदलण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2018 6:05 am

Web Title: electricity bill blacklisted
Next Stories
1 ‘क्रेझी केसल’मध्ये सुरक्षेचे नियम धाब्यावर!
2 इंजिनिअर मित्रांचा ‘देशी बारबेक्यू’!
3 आठ वर्षांच्या मुलीवर दहावीतील मुलाचा बलात्कार
Just Now!
X