नागपूर : रेल्वे विभागात लिपिक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला नोकरीतून कमी केल्याने त्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. रवींद्र संतोषराव ढोक (४२) असे आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

रवींद्र ढोक हे पत्नी व दोन मुलांसह हुडकेश्?वरमधील लाडीकर लेआउट, संत नामदेव नगरात राहत होते. ते नागपूर रेल्वे कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून कामाचा ताण वाढल्याने ते तणावात होते. त्यामुळे त्यांना दारूचे व्यसन जडले.त्यांना रेल्वे प्रशासनाने नोकरीतून काढून टाकले. निराशेच्या गर्तेत ते रविवारी सायंकाळी घरी आले.  एका खोलीत स्वत:ला बंद करून विष प्राशन केले. पत्नीच्या लक्षात येताच त्यांनी दार ठोठावले, परंतु प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांना आवाज दिला. त्यानंतर दरवाजा तोडून रवींद्र यांना मेडिकल रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.