News Flash

इंजिनिअर मित्रांचा ‘देशी बारबेक्यू’!

हा धाडसी प्रयोग समाजातील बेरोजगारांसाठी आदर्श ठरला आहे.

 

चौकट मोडून आर्थिक प्रगतीचा मार्ग

एक काळ होता जेव्हा अभियांत्रिकीला प्रतिष्ठेचे प्रचंड वलय होते. अभ्यासक्रम पूर्ण करताच नोकरीची शंभर टक्केखात्री होती, परंतु पुढे काळ बदलला आणि अभियांत्रिकीला वाईट दिवस आले. अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या दोन तरुणांनी मात्र निराश न होता वेगळी वाट शोधली आणि ‘देशी बारबेक्यू’ नावाचा व्हेज,नॉव्हेजचा स्टॉल लावून आर्थिक प्रगतीचा नवीन मार्ग प्रशस्त केला. त्यांचा हा धाडसी प्रयोग समाजातील बेरोजगारांसाठी आदर्श ठरला आहे.

संकेत राऊत आणि विवेक बुराडकर अशा दोन मित्रांचे नाव. जयताळा चौकात त्यांचे  स्टॉल आहे. पांडव अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असताना संकेत आणि विवेकची मत्री झाली. विवेकने मॅकेनिकल तर संकेतने संगणक शाखेतून २०१५-१६ साली अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. दोघांनी नोकरी शोधली. मात्र, पदरी निराशाच पडली. अशात दोघांनी पुणे गाठले तेथेही निराशा झाल्यावर ते नागपूरला परत आले.  दरम्यान, विवेक आणि संकेत जाफरनगर येथील बारबेक्यूचा आस्वाद घ्यायला जायचे. यातूनच त्यांना या व्यवसायाचे यश कळले.  फारसे भांडवल लागत नसल्याने विवेक आणि संकेतने घरून थोडा पसा घेत पाच बाय तीन असा छोटा स्टॉल आणि साहित्य खरेदी केले. बारबेक्यूचे प्रशिक्षण नसल्याने त्यांनी सुरुवातीला एक शेफ ठेवला. आणि जयताळा चौकाच्या शेजारी स्टॉल सुरू केला.

इतर मित्रांनाही प्रेरणा

अभियांत्रिकीची पदवी घेऊन रस्त्याशेजारी खाद्यपदार्थाचा स्टॉल लावणे अनेकांना लाजिरवाणे वाटते. मात्र, या दोघांनी कशाचीच तमा न बाळगता मेहनतीची तयारी दर्शवली आणि आपला व्यवसाय यशस्वी करून दाखवला. आता संकेत आणि विवेकची मिळकत बघून त्यांचे दोन मित्र पुण्याहून नोकरी सोडून आले. त्यांनीही देशी बारबेक्यूच्या बॅनरखाली नंदनवन येथे स्टॉल लावण्याची इच्छा व्यक्त केली असून पुढील महिन्यात ते देखील हा व्यवसाय सुरू करीत आहेत.

पहिली कमाई बाराशे रुपये

चिकन आणि पनीरचे पदार्थ  देशी स्टाईलने मिळत असल्याने पहिल्या दिवशी बाराशे रुपयांचा व्यवसाय झाला. सुरुवातीचे दिवस कष्टाचे गेलेत. मात्र नंतर व्यवसाय बऱ्यापकी स्थिरावला. दुसऱ्या दिवशी तेराशे रुपयांची कमाई झाली आणि मिळकतीत वाढ होत गेली.  दोन-चार महिन्यात दोघांनी शेफकडून बारबेक्यूचे धडे घेतले आणि घरीच बारबेक्यू तयार करण्यास सुरुवात केली. आज दररोज ३० किलो चिकन पदार्थाची विक्री होते. सायंकाळी सहा ते दहा या वेळेत हा स्टॉल लागत असून जवळपास ऐंशी ते नव्वद हजार रुपये महिना दोघे कमावतात. स्टॉलला हॉटेलचे रूप देण्याच्या तयारीत ते आहेत. भविष्यात  शाखाही वाढवायचा मानस संकेत आणि विवेकचा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2018 2:51 am

Web Title: engineers student barbecue business
Next Stories
1 आठ वर्षांच्या मुलीवर दहावीतील मुलाचा बलात्कार
2 .. तर काँग्रेस आमदारांचे अपहरण झाले असते!
3 …तर शिवसेनेत मोठी फूट पडेल, रामदास आठवलेंचा इशारा
Just Now!
X