26 September 2020

News Flash

मंत्रिमंडळ व महामंडळांवरील नियुक्त्यांकडे आता लक्ष

विधिमंडळाच्या अधिवेशनात घेण्यात आलेले निर्णय आणि इतर बाबींवर चर्चा करण्यात आली आहे.

जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता

विधान परिषदेच्या नागपूर मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध करण्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना यश आल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारात आणि महामंडळांवरील नियुक्त्यांमध्ये विदर्भातून कोणाला संधी मिळणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये गुरुवारी जवळपास दीड तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी चर्चा होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या काळात विस्ताराबाबत निर्णय अधिवेशनानंतर घेतला जाणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आटोपताच दुसऱ्या दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली असून त्यात मंत्रिमंडळ विस्तारासोबत शहराच्या विकास कामांबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.

भाजपकडून चार, शिवसेना दोन आणि मित्रपक्षाला दोन अशा पद्धतीने मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असून भाजपकडून इच्छुकांची अनेक नावे समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपच्या एका कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नागपूरला दोन दिवे देणार असल्याचे जाहीर केले असलेतरी प्रत्यक्षात ते शक्य नाही. मंत्रिमंडळ विस्तार करताना विदर्भातून एका आमदारांचा समावेश होण्याची शक्यता आहे. एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गडकरी आणि मुख्यमंत्री एकत्र आले असताना कार्यक्रमानंतर या दोन नेत्यांमध्ये बैठक झाली. त्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून महामंडळांवरील नियुक्तयाही रखडल्या आहेत. त्यावरही चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात घेण्यात आलेले निर्णय आणि इतर बाबींवर चर्चा करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून त्यादृष्टीने विदर्भातील काही आमदारांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री पूर्व विदर्भाचे प्रतिनिधीत्व करीत असल्यामुळे पूर्व विदर्भातील एकाही आमदाराला संधी मिळण्याची शक्यता नाही. मात्र, पश्चिम विदर्भातील एका तरी आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश व्हावा, असा प्रयत्न सुरू असून त्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेचा तपशील मात्र कळू शकला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2015 4:14 am

Web Title: expansion of cabinet ministry may possible in january first week
Next Stories
1 ‘गोरेवाडय़ा’ची इमारत तयार, कर्मचाऱ्यांचा मात्र अभाव
2 उच्च न्यायालयाची प्राधिकृत भाषा मराठी करण्याचा प्रस्ताव विचाराधीन
3 पालिकेच्या बाजार विभागातील पाचशेवर प्रकरणांची कागदपत्रे गहाळ
Just Now!
X