News Flash

टाळेबंदीमुळे भूखंड निविदेस मुदतवाढ

‘मिहान’मध्ये मोठी गुंतवणूक अपेक्षित

‘मिहान’मध्ये मोठी गुंतवणूक अपेक्षित

नागपूर :  मिहानमध्ये चार भूखंड विविध उद्योग-व्यवसायाकरिता देण्यात येणार असून करोनाच्या संकटामुळे निविदा भरण्याची मुदत दहा दिवसांनी वाढवण्यात आली आहे. आता भूखंडासाठी अर्ज करण्याची मुदत १० मे ऐवजी २० मे करण्यात आली आहे.

मिहानमधील सेझबाहेर चार भूखंड लीजवर देण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मे होती. परंतु महाराष्ट्र आणि अनेक राज्यात करोना संसर्गामुळे कडक निर्बंध लागू झाले आहे. त्यामुळे संभावित निविदाकारांनी मुदतवाढ देण्याची विनंती के ली. त्यावर महाराष्ट्र विमानतळ विकास कं पनीने निर्णय घेत दहा दिवसांची मुदतवाढ के ली आहे.

विदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प मिहानमध्ये अधिकाधिक उद्योग,धंदे लागून औद्योगिक प्रगती करण्याचे उद्दिष्टे आहे. त्यासाठी एमएडीसीने नॉनसेझमध्ये चार भूखंडासाठी निविदा काढली आहे. यामध्ये पावणे सात एकरचा भूखंड स्टार हॉटेलसाठी देण्यात येणार आहे. चार एकरचा भूखंड निवासी आणि वाणिज्यिक वापरासाठी, दीड हजार चौरस मीटरचा भूखंड हॉस्पिटल, नर्सिग होमसाठी देण्यात येईल आणि दीड एकर भूखंड प्रदूषण न करणाऱ्या उद्योगासाठी दिले जाणार आहे. यासाठी देशभरातून व्यावसायिक निविदा भरतील, अशी एमएडीसीला अपेक्षा आहे.

या माध्यमातून मिहानमध्ये मोठी गुंतवणूक होणे अपेक्षित आहे. परंतु महाराष्ट्रात आणि इतरही काही राज्यात टाळेबंदी असल्याने त्यास मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे एमएडीसीने निविदा भरण्याची मुदतवाढ के ली आहे. याशिवाय एमएडीसीने मिहानमधील विविध कं पन्यांना ऑप्टिक फायर के बल माध्यमातून इंटरनेट सेवा देण्यास इच्छुक कं पन्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या निविदेला देखील मुदतवाढ देण्यात आली आहे.

यासंदर्भात एमएडीसीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी ट्विट के ले आहे. मिहानमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनेकांनी रुची दाखवली आहे. त्यांनी टाळेबंदीमुळे मुदतवाढ करण्याची विनंती के ली. आम्ही १० मे ऐवजी २० मे र्पचत मुदतवाढ करण्याचा निर्णय घेतला. विविध वापरासाठी चार भूखंडात मोठी गुंतणूक होणे अपेक्षित आहे, असे दीपक कपूर म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2021 12:11 am

Web Title: expecting big investment in mihan sez zws 70
Next Stories
1 लोकजागर : ‘दीपाली’च्या निमित्ताने..
2 लसीकरण केंद्रात शारीरिक अंतर नियमांचा फज्जा!
3 ‘ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर’चाही तुटवडा
Just Now!
X