दिलीप ग्वालबंशीसह भूखंड हडपण्याचा प्रकार

भूमाफिया दिलीप शिवदास ग्वालबंशी यांच्यासह भाजपाचे नगरसेवक जगदीश ग्वालबंशी यांच्याविरुद्धही गिट्टीखदान पोलीस ठाण्यात भूखंड हडपणे, जीवे मारण्याची धमकी देणे आणि खंडणी मागण्याचा गुन्हा दाखल केला.

Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
police case marathi news, prithvi shaw marathi news
‘पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्या’, पृथ्वी शॉविरोधात गुन्हा न नोंदवल्याचे प्रकरण
india bloc, india bloc rally
जागावाटपावरून मतभेद, तरीही व्यासपीठावर एकत्र; ‘इंडिया’ आघाडीकडून एकजूट दाखवण्याचा प्रयत्न?
Hyderabad Inter-Faith Couple Attacked By Muslim
हैदराबादमध्ये आंतरधर्मीय जोडप्यावर हल्ला, VIDEO व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई, ४ जण गजाआड

मौजा हजारीपहाड परिसरातील खसरा क्रमांक-२, प्लॉट क्रमांक-३६ वेलकम हाऊसिंग सोसायटीजवळ शोभा पांडुरंग कोल्हे (६५) रा. दत्त मंदिरमागे यांच्या मालकीचा भूखंड आहे. ४ एप्रिल २०१७ ला दुपारी १ वाजेच्या सुमारास त्या पती नरेश गोडबोले यांच्यासह भूखंड पाहण्याकरिता गेल्या असता नगरसेवक जगदीश ग्वालबंशी, दिलीप शिवदास ग्वालबंशी आणि इतर १० ते १५ साथीदारांनी त्यांचा रस्ता अडविला आणि भूखंड विकण्यास सांगितले. त्यानंतर जगदीश ग्वालबंशी यांनी भूखंड परत हवा असेल तर २५ हजाराची मागणी केली. अन्यथा पुन्हा भूखंडावर पाय ठेवल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात कोल्हे यांच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तर मौजा हजारीपहाड येथील खसरा क्रमांक २/२ येथील ख्वाजा गरीब नवाज को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतील भूखंड क्रमांक-१४ हे चरणदास काशीराव जयस्वाल (६५) रा. १५ हनुमाननगर मेडिकल चौक यांच्या मालकीचे आहे. ७ जानेवारीला सकाळी ११ वाजेच्या सुमारास ते आपल्या मित्रासह भूखंड बघण्याकरिता गेले असता दिलीप शिवदास ग्वालबंशी, पप्पू यादव, छोटू गेंदलाल, जीतू अ‍ॅन्थोनी व इतर ७ ते ८ साथीदारांनी त्यांना अडविले व जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांना भूखंड परत मिळविण्यासाठी २५ हजारांची खंडणी मागितली व हाकलून लावले. या प्रकरणाही पोलिसांनी जमीन हडपणे, खंडणी मागणे आणि जीवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हा दाखल केला.