फेसबुकवरून ओळख झाली होती

नागपूर : अश्लील चित्रफीत प्रसिद्ध करण्याची धमकी देऊन एका महिलेला आठ लाखांनी लुबाडल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Shahid Kapoor Kriti Sanon film teri baaton mein aisa uljha jiya on OTT
‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ ओटीटीवर दाखल, कोणत्या प्लॅटफॉर्मवर बघता येईल शाहिद-क्रितीचा सिनेमा? वाचा
artificial intelligence generating revolution in film industry
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेने चित्रपटांना संजीवनी
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

कुमार आर. गवडी रा. मांचेरीयल, आदिलाबाद (तेलंगणा) असे आरोपीचे नाव आहे. पीडित ३६ वर्षीय फिर्यादी ही गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. जुलै २०१७ मध्ये फेसबुकवरून तिची आरोपीशी ओळख झाली. त्यानंतर त्यांनी एकमेकांना स्वत:चे मोबाईल क्रमांक दिले. व्हॉट्स अ‍ॅपवरून संवाद सुरू झाला. कालांतराने त्यांच्यात प्रेम निर्माण झाले. त्यानंतर काही दिवसांनी ती उपचाराकरिता हैदराबादला गेली असता तिची आरोपीशी भेट झाली. त्यावेळी आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवले व शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यावेळी आरोपीने तिचे अश्लील चलचित्र तयार केले. ती नागपुरात परतताच तिचे अश्लील  चलचित्र फेसबुकवर टाकण्याची धमकी दिली व तिला प्रथम १४ हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. बदनामीच्या भीतीने तिने त्याला पैसे दिले. कालांतराने त्याची हिंमत वाढली त्यानंतर वारंवार तिच्याकडून पैसे उकळू लागला. एक दिवस तो नागपुरात आला व तिच्या घरी थांबला.

परतताना तिच्या घरातील दागिने घेऊन गेला. अश्लील चित्रफीत फेसबुकवर टाकण्याची धमकी देऊन आरोपीने तिच्याकडून आतापर्यंत ८ लाख रुपये उकळले. त्याचा त्रास असह्य़ झाल्याने तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महिलेच्या घरात दोन महिने होता

पीडित महिला विवाहित असून कुरिअर सेवा चालवते. तिला बारा वर्षांची मुलगी असून तिच्या पतीला काही वर्षांपूर्वी अर्धागवायुचा झटका आला. तेव्हापासून तो अंथरुणावर खिळला आहे. तेव्हापासून महिलेचे आरोपीशी अनैतिक संबंध असून तो तिच्या घरी दोन महिने होता. पण महिलेने त्याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार न करता केवळ लुबाडणूक करून खंडणी मागण्याची तक्रार केली. त्यामुळे उलटसुलट चर्चाना पेव फुटले आहे.